चंद्रपुरातील भीषण पाणी टँचाईच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा जलसेवा रथ नागरिकांच्या सेवेत अम्मा ने दाखविली जलसेवा रथाला हिरवी झेंडी

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरातील भीषण पाणी टँचाईच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा जलसेवा रथ नागरिकांच्या सेवेत 

अम्मा ने दाखविली जलसेवा रथाला हिरवी झेंडी

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात मागील ५ ते ६ दिवसापासून भीषण पाणी टँचाई भासत आहे चंद्रपूर शहराला इराई धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो मात्र याद्वारे पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी लिकेज असल्यामुळं पाणी पुरवठा बंद आहे या पार्श्वभूमीवर यंदाही यंग चांदा ब्रिग्रेडचे जलसेवा रथ आजपासून सक्रिय झाले आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई(अम्मा) यांनी या जलसेवा रथाला हिरवी झेंडी दाखविली आहे. यानंतर सदर जलसेवा रथ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी रवाना झाले. विशेष बाब म्हणजे यावर्षीच्या उन्हाळ्याची सुरुवातच चंद्रपुरकराना भीषण पाणी टँचाई घेऊन आली की काय मागील ६ दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना मनपा प्रशासन सुस्त दिसत आहे की काय? कारण सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनाच पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आंदोलन करावी लागत आहे. शिवाय चंद्रपूर शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याची योजना केवळ शोभेची वस्तू ठरते की काय अशीच स्थिती आहे. दुसरीकडे टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात मनपा प्रशासन कमी पडत आहे.

         अशा स्थितीत जलसेवा रथाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग गल्ली, मोहल्ला पिंजून काढायचा आहे व नागरिकांना पाणी पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येईल तसेच या जलसेवा रथावर संपर्क क्रमांक टाकण्यात आला असून गरजू लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे पाणी टंचाई दूर होईपर्यंत या जलसेवा रथाच्या माध्यमातून सेवा देण्यात येईल तसेच गरज भासल्यास जलसेवा रथाची संख्या वाढविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)