वर्धा-बल्लारशाह पेसेंजरचा नागपूर पर्यंत, अमरावती-वर्धा पेसेंजरचा बल्लारशाह पर्यत वाढविण्याची मागणी - ना.हंसराज अहीर, माजी गृहराज्यमंत्री मध्यरेल्वेचे महाप्रबंधक श्री अनिलकुमार लाहोटी यांचे सोबत रेल्वे संदर्भात अनेक विषयांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी चर्चा केली

Vidyanshnewslive
By -
0

वर्धा-बल्लारशाह पेसेंजरचा नागपूर पर्यंत, अमरावती-वर्धा पेसेंजरचा बल्लारशाह पर्यत वाढविण्याची मागणी - ना.हंसराज अहीर, माजी गृहराज्यमंत्री 

मध्यरेल्वेचे महाप्रबंधक श्री अनिलकुमार लाहोटी यांचे सोबत रेल्वे संदर्भात अनेक विषयांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी चर्चा केली

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे गाड्यांच्या अनेक प्रश्नासंबंधी मध्यरेल्वेचे महाप्रबंधक श्री. अनिलकुमार लाहोटी यांची पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुंबई कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यानी  बल्लारपूर - वर्धा पॅसेंजरचा नागपूर पर्यंत तर अमरावती - वर्धा ही पॅसेंजर बल्लारपूर पर्यंत चालविण्यासाठी मागणी केली तसेच कोरोनाच्या संक्रमण काळापासून बंद असलेली काजीपेठ - मुंबई (वाया वर्धा) आनंदवन एक्सप्रेस व काजीपेठ - मुंबई (वाया आदिलाबाद) ताडोबा एक्सप्रेस सुरु करून ती दररोज करण्यात यावी, काझीपेठ - पुणे एक्सप्रेस आठवड्यातून ३ दिवस व काजीपेठ - अजनी सवारी गाडी कोरोना कालावधीपासून बंद असल्याने ती पूर्ववत सुरु करण्याकरिता प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्याची सूचना केली. वरील मागण्यांची दखल घेत जीएम यांनी प्रस्ताव तातडीने पाठवू असे सांगितले. ही बैठक सकारात्मक पार पडली असल्याची माहिती देण्यात आली असून लवकरच या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन मध्य रेल्वे च्या वतीने देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)