१० मार्चच्या रात्री वर्धा नदीच्या पुलावर झालेली घटना अपघात नसून अनैतिक संबंधातून झालेली हत्या अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा संशय ?

Vidyanshnewslive
By -
0

१० मार्चच्या रात्री वर्धा नदीच्या पुलावर झालेली घटना अपघात नसून अनैतिक संबंधातून झालेली हत्या 

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा संशय ?

बल्लारपूर :- १० मार्च रोजी रात्री दहा वाजता राजुरा येथुन बल्लारपूर कडे येताना एक व्यक्ती दुचाकीसह नदीत पडल्याचे व एक व्यक्ती पुलावर पडल्याची घटना घडली होती या घटनेला अपघाताचा स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न केला गेला पण बल्लारपूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासातच हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासाअंती उघड केले असुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक रामेश्वर उर्फ लाल्या कालीचरण निषाद (३०) आणि आरोपी सुरज हुबलस सोनकर शेजारी राहत होते मृतक रामेश्वरच्या पत्नी सोबत आरोपी सुरज चे अनैतिक प्रेम संबंध जुळले असल्याची माहिती आहे दोघांच्या प्रेमात पती अडसर ठरला होता त्याचा काटा काढायचा कट मागील दोन महिन्यापासून शिजला होता अगोदर ही कट रचला होता पण यशस्वी झाले नाही दिनांक १० मार्च रोजी आरोपी सुरज आणि सोबत असलेला दुसरा आरोपी अभिजित दिनेश पांडे रा, करणवाडी-मारेगाव, जिल्हा यवतमाळ याला सोबत घेऊन तिघेही राजुरा इथे राजु  धाब्यावर जेवणाची पार्टी करिता मृतक रामेश्वर ला घेऊन गेले. तिथे जाण्यापूर्वी तिघांनीही मद्यप्राशन केले. धाब्यावर जेवण करून परत येताना वर्धा नदीच्या पुलाजवळ आरोपींनी लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली व रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान रस्त्यावर रहदारी नसल्याचे हेरून त्यांनी रामेश्वर निषाद ह्याला पुलावरून नदीत ढकलून दिले व पुरावा मिळू नये ह्यासाठी दुचाकीही नदीत फेकली मुख्य आरोपी सुरज मात्र पुलावर पडुन राहिला. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना  कळताच पोलिसांनी रामेश्वरचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान नदीपात्रात दुचाकी आढळून आली मात्र रामेश्वरचा मृतदेह सापडला नव्हता. मात्र ह्या घडामोडीत पोलिसांना दुसराच संशय येत असल्याने व मिळणाऱ्या माहितीमध्ये घोळ असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला असता हा अपघात नसुन अनैतिक संबंधातून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, सतीश पाटील, शरद कुडे, संतोष दंडेलवार करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)