बल्लारपूर येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
वैज्ञानिक दृष्टीकोनाने समाज समृद्ध होतो _डॉ.बी .एम. बहिरवार
बल्लारपूर :- वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक दृष्टी यातून नवनवीन संशोधन होत असतात आणि हेच समाज उप योगी असतात. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे सामर्थ्य वैज्ञानिक दृष्टिकोनात आहे. असे प्रतिपादन डॉ। बी. एम .बहिरवार यांनी केले .स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ.जी .एस .गोंड आणि प्राध्यापक पी. बी .घोडे हे होते .या वैज्ञानिक कार्यक्रमाच्या निमित्त्याने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सेमिनार ,पोस्टर ,रंगोली ,क्विज, माक्रोपोडियम क्रास वर्ड इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेत बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक घोडे आणि डॉ. गोंड म्हणाले ,विज्ञान युगाची व्याप्ती मोठी जरी असेल तरीपण ज्या ठिकाणी विज्ञान युग पोहोचलेले नाही त्या ग्रामीण भागात अजूनही लोकांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी विविध उपक्रमाच्या माध्यमातून वैज्ञानिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील आपले विज्ञान विषयक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल नांदे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. निलेश जाधव यांनी केले .तर आभार प्राध्यापक प्रमोद खिराडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयीन विज्ञान क्लब समितीच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या