चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा जवळ दुचाकींचा अपघात : अज्ञात वाहनाने दिली धडक २ गंभीर जखमी
चंद्रपूर :- चंद्रपूर-मूल मार्ग अपघात प्रवण मार्ग बनतो की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करू लागला आहे दर आठवड्यात एक-ना-एक अपघात घडल्याचे वृत्त येऊन धडकतेच अशातच आज १४ मार्च २०२२ ला दुपारी ३:१५ च्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा जवळ २०० मीटर च्या अंतरावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याचे वृत्त असून या अपघातात २ व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. याविषयीच्या अधिक माहितीनुसार चंद्रपूर येथील सुधाकर भगत वय-४० व प्रविण लोणबले वय-४५ हे आपल्या दुचाकी क्र MH 34 BK 8376 ने मूल वरून चंद्रपूर ला येत असतांना जानाळा वरून २०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाने सदर दुचाकीला धडक दिली या अपघातात सुधाकर भगत व प्रवीण लोनबळे हे दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले असून या अपघाताची माहिती मूल पोलिसांना कळताच मूल येथील वाहतूक पोलिसांनी दोन्ही जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे या घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या