चंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरविलेले २०० मोबाईल चा शोध घेण्यात सायबर सेल ला यश

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरविलेले २०० मोबाईल चा शोध घेण्यात सायबर सेल ला यश

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हयातर्गत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ५७८ मोबाईल हरवल्याची तक्रार नागरिकांनी दाखल केली असून या यानुषणगाने सायबर सेल चंद्रपूरच्या वतीने आपल्या स्तरावर तपास करून २०० मोबाईलचा शोध घेतला व ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून संबंधित मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आल्याचे वृत्त आहे या संदर्भातील अधिक माहिती नुसार मागील काही दिवसाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विविध प्रकारच्या ५७८ मोबाईल हरविले असल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी पोलीस स्टेशन ला दाखल केली या यानुषणगाने सायबर सेल चंद्रपूर यांनी तपास कार्य करून ५७८ पैकी २०० मोबाईल ज्याची अंदाजित किंमत ३१ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  सदर मोबाईल ८ मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त संबंधित मोबाईल धारकांना परत करण्यात आले तसेच उर्वरित मोबाईलचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणात तपास करण्याचे कार्य सायबर सेल चे भास्कर चिंचवळकर यांनी केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)