बल्लारपूरातील महात्मा फुले महाविद्यालयात " सायबर सुरक्षा " विषयावर एनसीसी व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन
सायबर सुरक्षेविषयी जागृत राहणे ही काळाची गरज - उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर
बल्लारपुर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे आज बल्लारपूर पोलीस आणि 21महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा च्या महाविद्यालयिन एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने “सायबर सुरक्षा” या विषयावर एनसीसी छात्र सैनिक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य कु. पटवर्धन मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय कायरकर, प्रमुख मार्गदर्शक बल्लारपूर पोलिस दलातील ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश पाटील, तज्ञ मार्गदर्शक बल्लारपूर पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे, एएसआई रवी चेरकुरवार, उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले बल्लारपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवातून सायबर गुन्हेगारी वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले बल्लारपूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्री. शैलेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना सायबर सुरक्षे चे विविध आयाम ज्यात फिशिंग, हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, चाईल्ड प्रोनोग्राफी, समाज माध्यम, हनी ट्रॅप अश्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सर्वसामान्य नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हेगारा पासून स्वतःला कसे सुरक्षित ठेऊ शकतात याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. पंकज कावरे, प्रा. सतीश कर्णासे, डॉ. बादशहा चव्हाण, प्रा. विनय कवाडे, डॉ.रोशन फुलकर, प्रा. पंकज नंदुरकर, डॉ. सुनील कायरकर, , प्रा. बोरकर मॅडम डॉ. किशोर चौरे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साठी एन सी सी कॅडेट्सनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे प्रस्तावित लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे यांनी केले तर सूत्रसंचालन कॅडेट चैताली टपाले आणि आभार प्रदर्शन प्रा. विनय कवाडे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या