डॉ.श्याम तागडे यांच्यासह राज्यातील ९ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या !

Vidyanshnewslive
By -
0

डॉ.श्याम तागडे यांच्यासह राज्यातील ९ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या !

मुंबई : प्रशासकीय सेवेत दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मानले जाणाऱ्या गृह सचिवपदी आनंद लिमये यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच राज्य शासनाने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने गृह सचिवपद हे रिक्त होते. या जागी सामान्य प्रशासन विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव व १९८९च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आनंद लिमये यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. संजय चहांदे यांची सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. मेअखेर निवृत्त होणाऱ्या डॉ. चहांदे यांना तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नियुक्ती मिळाली आहे. शाम तागडे यांची गृह विभागात अपिल सचिव, आभा शुक्ला यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली. डी. गंगाथरन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अमित सैनी (मुख्य सचिव कार्यालय), राहुल द्विवेदी (सहआयुक्त विक्रीकर विभाग ), विवेक भीमनवार व्यवस्थापकीय संचालक, फलोत्पादन विभाग पदावर बदली करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)