कच्चा बदाम' या प्रसिध्द गाण्याचा गायक भुवन बडायकर अपघातात गंभीर जखमी

Vidyanshnewslive
By -
0

'कच्चा बदाम' या प्रसिध्द गाण्याचा गायक भुवन बडायकर अपघातात गंभीर जखमी

वृत्तसेवा :- गायक भुवन बडायकर याच्या 'कच्चा बादाम' या गाण्यानं अख्ख्या भारताला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं आहे. या प्रसिद्ध गायकाविषयी आलेली बातमी जरा मनाला चटका लावणारी आहे. बोललं जात आहे की सोमवारी रात्री उशिरा एका अपघातात आपला हा लाडका गायक जखमी झाला आहे. गायक भुवन हा एका सेकंड हॅंड कारवर गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेताना अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात भुवनच्या छातीला तसेच शरीराच्या इतर अवयवांनाही जबर मार बसल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर भुवनला पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. आज भुवन हा इंटरनेट स्टार आहे,सोशल मीडियावर त्याच्या 'कच्चा बादाम' गाण्याच्या रीलचा नुसता पाऊस पडताना आपण पाहत आहोत. त्यामुळे अर्थातच त्याच्या चाहत्यांनी त्याला झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली आहे. भुवन बडायकर पश्चिम बंगालमधील लक्ष्मीनारायण पुर पंचायतच्या 'कुरलजुरी' या गावचा रहिवाशी आहे. येथे तो आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत आहे. खरंतर भुवन हा आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी शेंगदाणे विकण्याचं काम करायचा. आणि त्याचवेळेला लोकांनी ते शेंगदाणे घेण्यासाठी आपल्याकडे यावं म्हणून तो 'कच्चा बादाम' हे गाणं गायचा. पण तेव्हा एका व्यक्तीन तो गाणं गातानाचा एक व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर पुढे जे घडलं ते इतिहासच म्हणावा लागेल. या गाण्यावर रिमिक्सही बनवण्यात आलं आहे. जवळजवळ ८० लाखापेक्षा अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. रोज शेंगदाणे विकून भुवन दिवसाला २०० ते २५० रुपये कमवायचा. पण गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली अन् त्यानं शेंगदाणा विक्रीच्या आपल्या व्यवसायाला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वीच भुवनला एका म्युझिक कपंनीनं कॉंट्रॅक्ट साइन करत तीन लाख रुपयाचा चेक दिल्याची बातमी आहे. भुवनला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे पश्चिम बंगाल पोलिसांनी देखील त्याचा सन्मान केला आहे. या गाण्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमातनं भुवनला गाण्याची संधी मिळाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)