अबब : चक्क १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक स्तरावरील अव्वल स्थानावर असलेल्या मग्नस कार्लसन यांना हरविले

Vidyanshnewslive
By -
0

अबब : चक्क १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक स्तरावरील अव्वल स्थानावर असलेल्या मग्नस कार्लसन यांना हरविले

वृत्तसेवा :- १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर  प्रज्ञानंदने यशस्वी चाल खेळत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला केले चेकमट केले आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करून मोठा धक्का दिला सोमवारी सकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रज्ञानंधाने काळे मोहरे खेळत कार्लसनला ३९ चालींमध्ये पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टरने या विजयातून आठ गुण मिळवले असून आठव्या फेरीनंतर तो संयुक्त १२ व्या स्थानी आहे. मागील फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या कार्लसनवर प्रज्ञानंद विजय अनपेक्षित होता. याआधी त्याने फक्त लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. याशिवाय प्रज्ञानंदने दोन गेम अनिर्णित राहिले, तर चार गेममध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने अनिश गिरी आणि क्वांग लिम विरुद्धचे सामने अनिर्णित केले तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना हरलेला रशियाचा इयान नेपोम्नियाची १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यानंतर डिंग लिरेन आणि हॅन्सन (दोन्ही १५ गुण) आहेत. एअरथिंग्स मास्टर्समध्ये १६ खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये, खेळाडूला विजयासाठी तीन गुण आणि ड्रॉसाठी एक गुण मिळतो. प्राथमिक टप्प्यात अजून सात फेऱ्या खेळायच्या आहेत. कोण आहे प्रगननंदा रमेशबाबू प्रगननंदा हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्याने १० वर्षांखालील विजेतेपद पटकावले. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. त्याला २०१८ मध्ये ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. तेव्हा त्याचे वय १२ वर्षे १० महिने १३ दिवस होते. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो केवळ तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याच्याआधी केवळ विश्वनाथन आनंद आणि पी हरिकृष्णा हे पराक्रम करू शकले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)