एसटी कामगारांच्या अहवालावर सुनावणीसाठी आणखी एक तारीख सुनावणी शुक्रवारी होणार ? विलीनीकरणाच्या याचिकेवर तारीख पे तारीख निकाल केव्हा लागणार अवघ्या राज्याच लक्ष लागलंय

Vidyanshnewslive
By -
0

एसटी कामगारांच्या अहवालावर सुनावणीसाठी आणखी एक तारीख सुनावणी शुक्रवारी होणार ?

विलीनीकरणाच्या याचिकेवर तारीख पे तारीख निकाल केव्हा लागणार अवघ्या राज्याच लक्ष लागलंय 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल १०९ दिवस विलीनीकरणासाठी संप पुकारला होता. सुरूवातील आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.

        आज मुंबई हायकोर्टात काय घडल मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. 22 डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता. 22 डिसेबरला देण्यात आलेल्या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढही देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हायकोर्टापुढे सादर करण्यात आला. हा अहवाल पाहिलात का, अशी विचारणा महामंडळाच्या वकिलांना हायकोर्टात करण्यात आली. मुख्य न्यायाधिशांनी महामंडलाच्या वकिलांना ही विचारणा केली. तुम्ही आधी अहवाल पाहा, असं आमचं मत असल्याचं मुख्य न्यायाधिशांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता शुक्रवारी या संदर्भातील पुढील सुनावणी पार पडणार आहे.

       अजून किती वाट पाहायची? या सुनावणीसाठी अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी एकवटले होते. कोर्टाकडून आज त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालय सुद्धा एसटी कामगारांना तारीख पे तारीख देऊन कामगारांचा अंत पाहतोय का? आजही एसटी कर्मचाऱ्यांना तारीख पे तारीख मिळाल्याने त्यांची मोठी निराशा झाली आहे. तीन महिने उलटून गेले तरी या मुद्द्यावर काहीही तोडगा निघालेला नाही. वारंवार महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करत आहे. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यात हजारो कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. हजारो कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आलीय. तर हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे. आता शुक्रवाही तरी हे प्रकरण तडीस लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)