चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा वाघांचा हल्ला : १ इसम गंभीर जखमी

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा वाघांचा हल्ला : १ इसम गंभीर जखमी

ब्रम्हपुरी :- जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्य जीव संघर्षात पुन्हा एक भर पडली आहे. सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे सदर घटना उत्तर वनक्षेत्रात मेंडकी अंतर्गत येणाऱ्या तळोधी खुर्द विकास नगर जंगल परिसरात घडली विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार सदर घटना २५ फरवरीला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडल्याचे वृत्त असून या हल्ल्यात होमराज ठवकर वय-४५ गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. याविषयीच्या अधिक माहितीनुसार होमराज ठवकर हा आपल्या २ मित्रांसह सायंकाळच्या सुमारास इंधन/सरपण गोळा करण्यासाठी विकास नगर जंगल परिसरात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक होमराज वर हल्ला चढविला यांनी किंचाळी मारली असता होमराजच्या मित्रांनी धावत येऊन आरडाओरडा केला त्यामुळे वाघ हा जंगलाच्या दिशेने पळून गेला यानंतर लगेच मित्राच्या मदतीने गावात आणून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक शिदूरकर, वनरक्षक टेकाम, ठाकरे यांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)