चंद्रपूरसह राज्यातील ३४ आकाशवाणी केंद्र येत्या १ एप्रिलपासून बंद होण्याच्या मार्गावर : विविध स्तरावर होतोय विरोध
वृत्तसेवा :- एकेकाळी ग्रामीण महाराष्ट्राची नाळ जुळलेली आकाशवाणी प्रत्येक जनमानसाच्या घरात पोहोचली होती मग ती शेतकऱ्यांचे कृषी विषयक कार्यक्रम असो वा विविधभारती द्वारे ऐकविण्यात येणारे गीत असो किंवा रोज सकाळी रेडियोच्या माध्ययमातून ऐकायला येणार मराठी भावगीत " उष:काळ होता, होता काळ रात्र झाली ......" मात्र आता येत्या काही दिवसात हे सर्व लुप्त होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एक नुकताच (अघोषीत) निर्णय घेतला आहे, देशभरात एक राज्य एक आकाशवाणी केंद्र राहील त्यानुसार देशातील प्रत्येक राज्यात असलेले | आकाशवाणी केंद्र बंद करण्यात येतील त्यांचे स्थानिक स्तरावर होणारे कार्यक्रम बंद करण्यात झाले आहेत ते केवळ १ फेब्रुवारी २०२२ पासून राज्यातील नेमून दिलेल्या मुख्यालयातील आकाशवाणी केंद्राचेच कार्यक्रमच सहक्षेपीत करतील असा आदेश पारित करण्यात आला. महाराष्ट्रात आज ३५ आकाशवाणी केंद्र आहेत त्यात ९ ते १० हज़ार समालोचक काम करीत आहेत. त्यात सकाळी सहा ते दुपारी अकरा व संध्याकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत स्थानिक आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारीत होत आहेत. यादरम्यान सकाळी ११ ते ५ पर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत आहे. राज्यात असलेल्या स्थानिक आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत स्थानिक प्रश्नांवर आधारित जनजागृतीच्या अनुषंगाने तसेच स्थानिक कालावंत विविध क्षेत्रातले तज्ञ अभ्यासक, वक्ते, साहित्यीक यांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम सादर होत आहेत, त्यामध्ये चिंतन, संध्याछाया किसानवाणी, कामगार सभा, शब्दलोक, राष्ट्र व धनसंपदा, युवावाणी, परिसर आसमा, शब्दलोक, राष्ट्रवाणी, वनिता मंडळ, हैलो सखी, बालसभा, आरोग्यमपावाणी, परिसर आपला या कार्यक्रमातून स्थानिक कलावंताना नवोदीत लावताना बालकांना महीला मंडळाचा , शेतकऱ्यांना त्यांचे कार्यक्रमाच्या मध्यामतून प्रश्न व शेतकऱ्यांनी केलेलं विशेष कार्य मांडण्याची संधी स्थानिक पातळीवर आकाशवाणी च्या माध्यमातून मिळत असते. विविध क्षेत्रातल्या साहित्य कला या व्यक्तींच्या मलाखती कविता /कथा प्रसारात होत होत्या. बालसभेत लहान मुलांचे कलागुणांना वाव मिळत होता. किसानवानी कार्यक्रमात स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कार्याची प्रसिद्धी या माध्यमातून मिळत होती. या सर्वांना आता केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आता पूर्णविराम मिळणार असुन स्थानिक पातळीवरच्या समस्या चांगले कार्य चांगल्या योजना या सर्वांना आता न्याय मिळणार नाही. आकाशवाणी केंद्र चालविण्यास निधी नसल्याचे कारण दाखवून केंद्र सरकारने स्थानिक आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असुन युवक, विद्यार्थी, कलावंत, विचारवंत ह्यांना मिळणारे हक्काचे व्यासपीठ कायमचे बंद होण्याची चिन्हे असुन केंद्राच्या ह्या निर्णयाला सर्वत्र विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मधे नगरसेवक संजय वैद्य, प्राचार्य श्याम मोहरकर (चित्रपट, साहित्य, कला व सांस्कतिक चे जिल्हा अधक्ष), अक्षय कुकडे उपस्थीत होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या