समाज प्रबोधनाचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे संत गाडगेबाबा यांची जयंती बल्लारपूरात उत्साहात साजरी बल्लारपूरातील अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन !

Vidyanshnewslive
By -
0

समाज प्रबोधनाचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे संत गाडगेबाबा यांची जयंती बल्लारपूरात उत्साहात साजरी

बल्लारपूरातील अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन !

बल्लारपूर :- समाजातील असलेल्या अनिष्ठ, रूढी, प्रथा परंपरा विरुध्द कडाडून हल्ला करणारे समाज प्रबोधनाचे चालते-बोलते विद्यापीठ व समाज परिवर्तनाचे विचारपीठ संत गाडगेबाबा यांची आज जयंती यानिमीत्ताने बल्लारपूर शहरातील तहसिल कार्यालयात मा.संजयकुमार राईचंवार यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, तर नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले यावेळी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गाडगेबाबा यांना अभिवादन केले, बल्लारशाह वनपरिक्षेत्र कार्यालयात मा.संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले यासोबतच बल्लारपूर शहरातील राजकीय पक्षांनी सुध्दा आप आपल्या पक्ष कार्यालयात स्वच्छतेचे पुजारी व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा ना अभिवादन केले. अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे अनेक शाळा-महाविद्यालय व  कार्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले आहे. यानिमित्ताने बल्लारपूर शहरातील बचत गटाच्या मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे तसेच अनेक ठिकाणी स्वच्छतेविषयीच महत्व पटवून देण्यात आलं

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)