ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या मतदाराचा घेतला आशिर्वाद, प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या मतदाराचा घेतात आशिर्वाद; शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद (Na. Sudhir Mungantiwar takes first voter's blessing, takes first voter's blessing before starting campaign; Blessing of the last voter on the last day)

Vidyanshnewslive
By -
0
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या मतदाराचा घेतला आशिर्वाद, प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या मतदाराचा घेतात आशिर्वाद; शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद (Na. Sudhir Mungantiwar takes first voter's blessing, takes first voter's blessing before starting campaign; Blessing of the last voter on the last day)
चंद्रपूर :- सुधीरभाऊ मुनगंटीवार गेल्या 30 वर्षांपासून जनतेची सातत्याने सेवा करीत आहेत. आता सातव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि त्यांचा विजय पक्का आहे. पण सुधीरभाऊंच्या प्रत्येक कार्यात वेगळेपण आणि नाविन्य असतं. त्यातील एक म्हणजे निवडणुकीच्या मुख्य प्रचाराची सुरुवात करताना पहिल्या मतदाराचा आशिर्वाद घेणे होय. संपूर्ण राज्यामध्ये मतदारांशी संबंध प्रस्थापित करण्याचा असा अनोखा आणि आगळावेगळा प्रयोग करणारे सुधीरभाऊ पहिलेच नेते आहेत. सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संबंध असणारे सुधीरभाऊ एकमेव नेते आहेत. मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीने फोन केल्यावर त्या माणसाला सुधीरभाऊंचा फोन येणार नाही असे कधीच घडले नाही. युवकांकडून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही फोन केला, पत्र लिहिलं, निवेदन दिलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर आल्याशिवाय राहत नाही. मागील सहा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची सुरुवात करण्याआधी पहिल्या मतदाराचा आशीर्वाद घेतला आहे. तर प्रचाराचा शेवट सुद्धा शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद घेऊन करतात. आता सातव्यांदा अर्ज दाखल केल्यावर पहिल्या बूथच्या पहिल्या अनुक्रमणिकेतील, पहिल्या यादीतील पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेतला. भटाळी पायली येथे आशा विकास आलोने या पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेऊन सत्कार केला. मतदार यादीतील पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकावरील मतदारांचा असा सन्मान करणारे ते एकमेव नेते आहेत, हे विशेष. संपूर्ण जिल्ह्यात इतका दांडगा जनसंपर्क कोणत्याही नेत्याचा नाही. विरोधकांशी लढताना आपलं अस्त्र केवळ जनतेचे प्रेम आहे, असे सुधीरभाऊ नेहमी सांगतात. आज त्यांनी पहिल्या मतदारासोबतच शालिनी धर्मेंद्र आलोने , सुंगदा बाई मेश्राम, शारदा भसारकर, योगेश अलोने या मतदारांचे आशीर्वाद घेऊन सत्कार केला. सातव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या सुधीर भाऊंना भटाळी पायली येथील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सुधीरभाऊंना मिळाला. 
यावेळी भटाळी गावाच्या पुनर्वसनाचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. भविष्यात मोठे उद्योग आणून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार असून भविष्यात फिरते जनसंपर्क कार्यालय निर्माण करून नागरिकांच्या समस्या आणखी लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच 'आवाज दो' या अभियानाच्या माध्यमातून दहा टेलिफोन नंबरवरून नागरिकांना आपल्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)