ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूर मतदारसंघाला रोजगाराचे कवच, जिल्ह्यातील बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य, मुल येथे 600 नागरिकांच्या हाताला काम, पोंभुर्णा येथे कार्पेट निर्मिती केंद्र Due to Mr. Sudhir Mungantiwar, employment cover for Ballarpur Constituency, 292 Crores funding to self-help groups in the district, employment for 600 citizens at Mul, carpet manufacturing center at Pombhurna.

Vidyanshnewslive
By -
0
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूर मतदारसंघाला रोजगाराचे कवच, जिल्ह्यातील बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य, मुल येथे 600 नागरिकांच्या हाताला काम, पोंभुर्णा येथे कार्पेट निर्मिती केंद्र  Due to Mr. Sudhir Mungantiwar, employment cover for Ballarpur Constituency, 292 Crores funding to self-help groups in the district, employment for 600 citizens at Mul, carpet manufacturing center at Pombhurna.


बल्लारपूर - राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक संकल्पनेत रोजगार केंद्रस्थानी राहिलेला आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराचे कवच निर्माण करण्याचे काम ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. मुल येथील 600 महिलांच्या हाताला काम देण्याचा विषय असो वा पोंभुर्णा येथे कार्पेट निर्मिती केंद्रासारखे उद्योग असो रोजगाराला त्यांनी कायम प्राधान्य दिले आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्वल राहावा, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. त्यासाठी विधानसभेत वेळोवेळी त्यांनी बल्लारपूर मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा आवाज बुलंद केला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इतर सर्व क्षेत्रांच्या विकासासह औद्योगिक विकासाचा मुद्दाही मांडला होता. आपल्या क्षेत्रात जास्तीत जास्त मोठे उद्योग येतील आणि रोजगार निर्मिती होईल, यादृष्टीने पाऊल उचलणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त युवकांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करणे, बेरोजगार व नव उद्योजकांना उद्योगासंबंधी सर्व माहिती व प्रक्रिया एका छताखाली मिळण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर येथे बिझनेस फॅसिलिटी व एक्सपोर्ट केंद्र सुरू करणे यादृष्टीने पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने गेल्या काळात राबविलेल्या योजनांची देखील यानिमित्ताने चर्चा होत आहे. यात विशेषतः त्यांनी मुल तालुक्यात विविध कंपन्यांतून 600 हून अधिक नागरिक, महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्पेट सेंटर, बांबू हस्तकला केंद्र, अगरबत्ती केंद्र, कुक्कुटपालन फार्म याशिवाय बरेच उद्योग ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकराने उभे राहिले आहेत. पोंभुर्णा येथे रोजगार निर्मितीसाठी टुथपिक निर्मिती केंद्र, बाम्बू हँडीक्राफ्ट व आर्ट युनिट, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, कार्पेट निर्मिती केंद्र यांचा तर आवर्जून उल्लेख केला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होत आहे. बल्लारपूर तालुक्यात देखील विसापूर येथे बाम्बू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या माध्यमातून महिला व तरुणांसाठी रोजगाराचे दालन त्यांनी खुले करून दिले आहे. 15 गावांमध्ये स्व. सुषमा स्वराज उद्योग भवन महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी 15 गावांमध्ये स्व. सुषमा स्वराज उद्योग भवनाची निर्मिती करण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी प्रत्येकी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला. या भवनातून महिला बचत गटांना थेट रोजगाराचा मार्ग खुला व्हावा, असा ना. श्री. मुनगंटीवार यांचा उद्देश आहे. 
           75 हजार कोटींची गुंतवणूक ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यावर्षी मार्चमध्ये जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अॅडव्हांटेज चंद्रपूरचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 75 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच आशियातील हा सर्वात मोठा उद्योग पोंभुर्ण्यामध्ये उभा राहणार आहे. येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील तसेच मतदारसंघातील तरुण रोजगारक्षम बनेल, यासाठी विशेष लक्ष देण्याचा मानस ते व्यक्त करतात.  एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केले जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतला आहे. एमआयडीसीमधील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून चंद्रपूर जिल्हा फर्निचर एक्सपोर्ट मध्ये जोधपूरलाही मागे टाकेल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांना आहे. बल्लारपूर आयटीआयसाठी 15 कोटी कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात उभारले जात आहे. याठिकाणी महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. या बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या अर्थसहाय्यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बचत गटांना रोजगाराची नवी संधी निर्माण झाली आहे. हे विशेष.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)