बंडोबा होणार का थंडोबा की राजकीय पक्षाचे समीकरण बिघडविणार? (Will Bandoba become Thandoba or will the equation of the political party be disturbed?)
वृत्तसेवा :- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आज सोमवार, ४ नोव्हेंबर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातून कोण कोण आपली उमदेवारी मागे घेतो हे स्पष्ट होणार असतानाच, विविध पक्षांतील बंडखोर उमदेवार काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतून आपल्याला उमदेवारी मिळेल या आशेत असलेल्या अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला. यात काही नावे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देताच, आपला मतदार संघ बदलून चंद्रपुरात आलेले राजू झोडे नाराज झाले. त्यांनी बंडखोरी केली. महेश मेंढे यांनीही आपला उमदेवारी अर्ज सादर केला होता. पण तो छाणणीत रद्द झाला. तर या मतदार संघातून भाजपाने पूर्वीचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिल्याने २००० सालापासून भाजपात कार्यरत व अनेक पद भुषवलेल्या ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. अभिलाषा गावतुरे यांना डावलून चंद्रपूर बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे, नाराज डॉ. गावतुरे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला. तर राजुरा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. तेथे भाजपाने देवराव भोंगळे यांना उमेदवारी देताच पक्षातील दोन वरिष्ठ नेते, माजी आमदार अॅड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी बंडखोरी केली. हे दोघेही सोमवारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरोरा येथे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाला म्हणजे प्रविण काकडे यांना उमदेवारी दिली. तर त्यांचेच भासरे अनिल धानोरकर नाराज झाले. त्यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी दाखल केली. तसेच निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच जे या मतदार संघात जोरात प्रचार करीत होते ते डॉ. चेतन खुटेमाटे यांनाही उमदेवारी सादर केली. तर भाजपात रमेश राजूरकर यांच्याऐवजी माजी मंत्री संजय देवतळे यांचे पूत्र करण देवतळे यांना उमेदवारी मिळाल्याने राजूरकर यांनी बंड पुकारले असून बंडोबा असेच निवडूणुकीत कायम राहणार की त्यांची तलवार म्यान होऊन एकनिष्ठतेने पक्षासाठी कार्य करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments