शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघांसाठी 105 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल (Nomination applications of 105 candidates for 6 constituencies in Chandrapur district were filed on the last day)

Vidyanshnewslive
By -
0
शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघांसाठी 105 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल (Nomination applications of 105 candidates for 6 constituencies in Chandrapur district were filed on the last day)


चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे (अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे ( भारतीय जनता पार्टी), मंगेश हिरामण गेडाम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन गोदरु जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), भूषण मधुकर फुसे (संभाजी ब्रिगेड), किरण गंगाधर गेडाम (अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), अभय मारोती डोंगरे (बहुजन समाज पक्ष), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि वामन उद्धवजी आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले. 71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात विनोद कवडुजी खोब्रागडे (अपक्ष), प्रकाश शंकर रामटेके (बहुजन मुक्ती पार्टी), प्रविण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज गोपीचंद लाडे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश उध्दवराव ताकसांडे (अपक्ष), किशोर गजानन जोरगेवार (भारतीय जनता पार्टी), ब्रिजभुषण महादेव पाझारे (अपक्ष), कोमल किशोर जोरगेवार (अपक्ष), मोरेश्वर कोदुजी बडोले (अपक्ष), राजु चिन्नया झोडे (अपक्ष), ॲङ विशाल शामराव रंगारी (बहुजन रिपब्लीक सोशालिस्ट पार्टी), अरुण देविदास कांबळे (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया (रिफारनिष्ठ), बबन रामदास कासवटे (अपक्ष), स्नेहल देवानंद रामटेके (वंचित बहुजन आघाडी), आशिष अशोक माशीरकर (अपक्ष), आनंद सुरेश इंगळे (अपक्ष), संजय निळकंठ गावंडे (अपक्ष), ज्ञानदेव भजन हुमणे (अपक्ष), देवानंद नामदेवराव लांडगे (अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रतन प्रल्हाद गायकवाड (अपक्ष), प्रवर्तन देवराव आवळे (अपक्ष), भिमनवार संजय परशुराम (राष्ट्रीय समाज पक्ष), ॲड राहुल अरुण घोटेकर (अपक्ष), भावेश राजेश मातंगी (अपक्ष), महेश मारोतराव मेंढे (अपक्ष), प्रतिक विठल डोर्लीकर (ऑल इंडियन रिपब्लीक पार्टी), अशोक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष) यांचा समावेश आहे. 72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याबुक सय्यद (अपक्ष), रावत संतोषसिंह चंदनसिंह (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), उमेश राजेश्वर शेंडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), सत्यपाल राधोजी कातकार (अपक्ष), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनिता सुधाकर (अपक्ष), नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थूलकर (ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी), संजय शंकर कन्नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सय्यद अफजल अली सय्यद आबिद अली (अपक्ष), संदीप अनिल गि-हे (अपक्ष), विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष). 
             73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात चक्रधर पूनिराम मेश्राम (जन जनवादी पक्ष), चक्रधर दोनुजी जांभुळे (कृतीशील गणराज्य पार्टी), गुरुदेव डोपाजी भोपाये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), प्रशांत डांगे (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), केवलरम पारधी (बहुजन समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी), रमेश मडावी (बहुजन समाज पार्टी), नारायण जांभुळे (स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - ए), प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी) आणि पराग साहरे (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले. 74 - चिमूर विधानसभा मतदारसंघात योगेश नामदेवराव गोंनाडे (अपक्ष), निकेश प्रल्हाद रामटेके (अपक्ष), अमित हरिदास भीमटे (अपक्ष), नारायणराव दिनबाजी जांभुळे (अपक्ष), हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष), राजेंद्र हरिचंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (अपक्ष), मडावी मनोज उद्धवराव, रमेश बाबुराव पचारे (अपक्ष), जितेंद्र मुरलीधर ठोंबरे (अपक्ष), केशव सिताराम रामटेके (अपक्ष). 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण धोंडोजी सुर (मनसे), जयवंत नथुजी काकडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), दिनेश दादाजी चोखारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), महेश पंढरिनाथ ठेंगणे (अपक्ष), रमेश कवडूजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), मुकेश मनोजराव जीवतोडे (अपक्ष), अंबर दौलतराव खानेकर ( राष्ट्रीय समाज पक्ष), सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष) यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)