चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघात 95 उमेदवार रिंगणात 25 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली, बंडखोरी कमी-जास्त प्रमाणात कायम (In 6 constituencies of Chandrapur district, 25 candidates withdrew their candidature out of 95 candidates, insurgency continues more or less.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघात 95 उमेदवार रिंगणात 25 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली, बंडखोरी कमी-जास्त प्रमाणात कायम (In 6 constituencies of Chandrapur district, 25 candidates withdrew their candidature out of 95 candidates, insurgency continues more or less.)


चंद्रपूर :- येत्या २० नोव्हेंबरला होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही मतदार संघात जवळजवळ सार्‍याच पक्षांत मोठी बंडाळी झाली होती. त्यापैकी २५ उमदेवारांनी बंडखोरी मागे घेतली. तर ९५ उमेदवार अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्यांच्या नावाची खुप चर्चा होती असे भाजपाचे बंडखोर ब्रिजभुषण पाझारे यांनी मात्र त्यांचा अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे चंद्रपुरात बंडखोरी कायम आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून केवळ प्रियदर्शन इंगळे या उमदेवारानेच आपली उमेदवारी मागे घेतली. तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून चव्हाण रामराव ओंकार, डॉ. राकेश गावतुरे, अनिता सुधाकर गावतुरे, अ‍ॅड्. सत्यपाल कातकर, डॉ. संजय घाटे, नरेंद्र सोनारकर, संदीप गिर्‍हे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथून डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा अर्ज मात्र कायम आहे. त्यांनी माघार घेतली नाही. राजुरा विधानसभा क्षेत्रातून सुदर्शन निमकर, अ‍ॅड्. संजय धोटे, रेशमा गणपत चव्हाण, तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून वसंत वारजूकर, प्रेमीला मेश्राम, विनोद नवघडे, अनंता भोयर यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. वरोरा विधानसभेतून रंजना पारशिवे, अमोल बावणे, जयंत टेमुर्डे, महेश पंढरीनाथ ठेंगणे, नरेंद्र नानाजी जिवतोडे, रमेश महादेव राजूरकर हे माघारी फिरले आहे. तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातून अ‍ॅड्. हेमंत सुखदेव उरकुडे, योगेश नामदेव गोन्नाडे, धनराज रघुनाथ मुंगले, डॉ. प्रकार नक्कल नान्हे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातून मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर यांची बंडखोरी शांत करण्यात पक्षाला यश आले आहे. या दोघांनीही त्यांचे नामांकन अर्ज आज मागे घेतले. वरोरा मतदार संघातूनही भाजपाचे रमेश राजुरकर यांनी माघार घेतली. तर चिमुरात धनराज मुंगले यांची बंडखोरी शांत झाली. बल्लारपुरातून उबाठाचे संदीप गिर्‍हे 'मॅनेज' झाले असून, तेही निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहे. या प्रमुख बंडखोरांमुळे त्यांच्या त्यांच्या पक्षातील अधिकृत उमेदवारांना त्यांच्या मतदार संघात थोडा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर मात्र यास अपवाद ठरले. येथे भाजपाचे ब्रिजभुषण पाझारे यांनी आपली उमदेवारी कायम ठेवली आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. 
                एकूण ९५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आता राजूरा विधानसभा  मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे. त्यात प्रामुख्याने देवराव भोंगळे, सुभाष धोटे, वामन चटप, गजानन जुमनाके यांचा समावेश आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात उरलेल्या १६ उमदेवारांत किशोर जोरगेवार, प्रवीण पडवेकर, ब्रिजभूषण पाझारे, राजू झोडे, यांचा समावेश आहे. तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवारांची माघार घेतली असून, २० उमदेवार कायम आहे. त्यास सुधीर मुनगंटीवार, संतोषसिंह रावत, अभिलाषा गावतुरे आदींचा समावेश आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघात रिंगणात उरलेल्या १४ उमदेवारांत प्रामुख्याने विजय वडेट्टीवार, कृष्णालाल साहारे यांचा समावेश आहे. चिमूर मतदारसंघात ४ उमेदवारांनी माघार घेतली असून, किर्तीकुमार भांगडीया, सतिश वारजुकर यांच्यासह १३ उमदेवार निवडणूक लढवत आहेत. वरोडा मतदारसंघात कामय असलेल्या १८ उमेदवारांत करण देवतळे, प्रवीण काकडे, अहेतेश्याम अली, चेतन खुटेमाटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूरातून सर्वाधिक 20 उमेदवार तर चिमुरातून सर्वात कमी 13 उमेदवार आपल नशीब अजमाविणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)