बल्लारपुर पोलीसांनी कारवाई, विसापुर येथुन गाई चोरी करणाऱ्या टोळीस केले गजाआड..! (Ballarpur police took action, raided the cow stealing gang from Visapur..!)
बल्लारपूर :- उल्लेखनीय कामगिरी अशी की, पोलीस ठाणे बल्लारपुर हद्दीतील मौजा-विसापुर येथील फिर्यादी नामे- मनोहर बापुजी गिरडकर वय-४५ वर्षे, रा. विसापुर ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर याने दिनांक- ३१/१०/२०२४ ला पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, त्याची मालकीची एक पांढऱ्या रंगाची गाय वय अंदाजे ०६ वर्षे कि.अं.१५,०००/-रु. ची चोरीस गेल्याबाबत पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा रजि.क्रं.१००३/२०२४ कलम-३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोंद केला असुन सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध कामी गुन्हयाचे तपास अधिकारी पोउपनि. हुसेन शहा व डि.बी. स्टॉफ यांनी अज्ञात आरोपीचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन खालील आरोपीतांना अटक केली आहे १) एजाज बेग असलम कुरेशी वय ३६ वर्षे रा. नुरी चौक, बगड खिडकी वार्ड चंद्रपुर. २) वसीम कुरेशी नबी कुरेशी वय-३६ वर्षे रा. नुरी चौक, बगड खिडकी वार्ड, चंद्रपुर. ३) मोहम्मद फैज अब्दुल रशीद वय-२२ वर्षे रा. कसाबपुरा मरकस मस्जिद जवळ, चांदुरबाजार जिल्हा- अमरावती. ४) अब्दुल इसरार कुरेशी अब्दुल जलील कुरेशी वय-२६ वर्षे रा. जिलानी नगर दादमहल वार्ड, चंद्रपुर यातील आरोपीतांना दिनांक - ०१/११/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेकडुन सदर गुन्हयात वापरण्यात आलेल्या १) कि.अं.१,२०,०००/-रु. एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची टाटा व्हिस्टा चारचाकी वाहन क्रं. एम.एच.४९ बी. ५३६३. २) कि. अं. १,००,०००/- एक जुनी वापरती सिल्व्हर रंगाची टाटा इंडिका चारचाकी वाहन क्रं. एम.एच.३४ के ५८९४. ३) इतर मुदेदेमाल व नगदी रोख रक्कम कि.१६,०००/-रु. असा एकुण - २,३६,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आली.
सदर आरोपीतांकडे अधिक तपास केला असता त्यांनी यापूर्वी वेगवेगळया ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तरी सदर आरोपीतांचा आज रोजी एम.सी.आर. करित असुन आरोपीची कस्टडी पाहिजे असल्यास पोलीस ठाणे बल्लारपुर येथे संपर्क करावे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, पोउपनि. हुसेन शहा, सफी. गजानन डोईफोडे, आंनद परचाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पोअं. विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आजम, भुषण टोंग, खंडेराव माने, लखन चव्हाण, भास्कर चिचवलकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments