चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी, तर बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Expenditure Account Scrutiny of Chandrapur Constituency Candidates on November 9, 13 & 19, Ballarpur Constituency Candidates Expenditure Account Scrutiny on November 7, 11 & 17 Candidates or their representatives are invited to attend)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी, तर बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Expenditure Account Scrutiny of Chandrapur Constituency Candidates on November 9, 13 & 19, Ballarpur Constituency Candidates Expenditure Account Scrutiny on November 7, 11 & 17 Candidates or their representatives are invited to attend) 


चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवर दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, दुसरा माळा, चंद्रपूर येथे करण्यात येईल. 71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.
               भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 72 - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी रविवार दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे करण्यात येईल. 72 - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे बल्लारपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)