स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन लाखांचा दारुसाठा व 3 व्यक्तींना अटक (Action of local crime branch, liquor stock of two lakhs and arrest of 3 persons)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन लाखांचा दारुसाठा व 3 व्यक्तींना अटक (Action of local crime branch, liquor stock of two lakhs and arrest of 3 persons)


चंद्रपूर :- स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत दि. 1 नोव्हेंबर 2024 ला आरोपी नामे कैलास महादेव मांढरे, वय 22 वर्ष, रा. विजासन, ता. भद्रावती जि. चंद्रपूर + 3 यांना अवैद्यरित्या विक्री करिता मोटर सायकल व मोपेड ने देशी दारू वाहतूक करतांना खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला. जप्त माल :- १) 03 दुचाकी वाहने – किंमत 1,85,500/- ₹, २) 05 पेट्या देशी दारू – किंमत 17,500/- असा एकूण 2,02,500/- रू. चा मुद्देमाल मिळून आला. पो स्टे भद्रावती येथे अप. क्र. 552 /2024 कलम 65(अ), 83 मदाका अन्वये गुन्हा दाखल करून सदर मुद्देमाल मोहरर च्या ताब्यात देण्यात आला. कारवाई पथक महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. स्वामिदास चालेकर, धनराज करकाडे, पो.हवा. नितीन कुरेकर, अजय बागेसर, पो. अं. शशांक बदामवर सर्व स्थागुशा चंद्रपूर यानी कारवाई केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)