नागपुरात 6 नोव्हेबरला होणार संविधान महोत्सव, विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांची उपस्थिती लाभणार (Constitution festival to be held in Nagpur on 6th November, opposition leader MP. Rahul Gandhi will be present)
नागपूर :- भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली. नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संविधान संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात मनुवाद, संविधान, मनुस्मृती महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे यावर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत, हा देशाला मोठा धोका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. संविधानाने आपले रक्षण केले आहे. देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळे हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे. . वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी स्वीकारले आहे. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. ओबीसी युवा मंच यांनी संमेलनाचे निमंत्रण दिले होते. उमेश कोर्राम आणि अनिल जयहिंद यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. हा पूर्णतः अराजकीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, हे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments