बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्वपक्षीय उमेदवारांची SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रीमि्लेयर व माझी भूमिका या विषयावर खुली चर्चा (Open discussion on classification of SC/ST reservation and cremelayer and my role by all party candidates from Ballarpur Assembly Constituency)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतांना येत्या 4 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीतुन किती उमेदवार आपली उमेदवारी परत घेतात याकडे लक्ष लागले असून बल्लारपूर शहरात व विधानसभा क्षेत्रातील राजकीय नेते व आमदाराची भूमिका स्पष्ट होण्याच्या दृष्टीने बुध्द पौर्णिमा समारोह समिती बल्लारपूरच्या वतीने दि. 7 नोव्हेंबर 2024 ला सायंकाळी 4:00 वाजता एकदंत लान नगर परिषद स्विमिंग टॅंक जवळ बल्लारपूर येथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्वपक्षीय उमेदवारांची SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रीमि्लेयर आणि माझी भूमिका या विषयावर खुली चर्चा चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्र, मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार, भारतीय जनता पार्टी, मा. संतोषसिहं रावत, काँग्रेस पक्ष, मा. सतिश मालेकर, वंचित बहुजन आघाडी, मा. नरेंद्र सोनारकर, बहुजन समाज पार्टी, मा. भारत थुलकर, भारिपा, मा. अभिलाषा गावतुरे, मा. संदीप गिऱ्हे, मा. प्रकाश पाटील मारकवार, सर्व उमेदवार आपली भूमिका मांडणार असून यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी एका विचार मंचावर येण्याचा एक क्षण असून या कार्यक्रमाला जनतेनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)