स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह एक जिवन्त काडतूस जप्त (Action by local crime branch, one live cartridge with country cut was seized)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत खंजरभाई या आरोपी कडून देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. ३१ ऑक्टोबर ला विधानसभा निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली नुसार शुभम उर्फ खंजरभाई वासेकर रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर याचेजवळ बंदुक आहे. माहितीवरून शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर (२२), धंदा मजुरी, रा. महाकाली कॉलरी, आनंदनगर, चंद्रपुर यास डब्लु.सी.एल एरिया रेती बंकर, बाबानगर बायपास रोड, चंद्रपूर येथे ताब्यात घेवुन त्यास अग्निशस्त्राबाबत माहिती विचारली असता आरोपी शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर याने एक गावठी देशो कट्टा किंमत १० हजार रु व एक जिवंत रांउड (बुलेट) अंदाजे किंमत २ हजार एकुण १२ हजार अशा वस्तु काढुन दिल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपीने विनापरवाना एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा अग्निशस्त्र व एक पितळी धातुची जिवंत बुलेट (रांउड) दारूगोळा असा बाळगला असल्याने त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पो हवा. जयंत चूनारकर, चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, पो.अ. किशोर वाकाटे अमोल सावे प्रफुल गारघाटे स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केले आहे. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.
Post a Comment
0Comments