निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न, बँकेची पदभर्ती प्रक्रिया नियमानुसार - संतोषसिहं रावत (Trying to defame me in the face of elections, bank's recruitment process as per rules - Santosh Singh Rawat)

Vidyanshnewslive
By -
0
निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न, बँकेची पदभर्ती प्रक्रिया नियमानुसार - संतोषसिहं रावत (Trying to defame me in the face of elections, bank's recruitment process as per rules - Santosh Singh Rawat)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भर्ती प्रक्रिया ही नियमानुसार होत असून नौकर भर्ती मधून आरक्षण हटविले अशी चुकीची माहिती देऊन बँकेच्या प्रगती मध्ये अळथळा आणण्याचे काम काही प्रसारमाध्यमाद्वारे प्रकाशित झाले विधानसभा निवडणुकीत मला बदनाम करण्याचा प्रयत्न हेतूपूरसर पने केला जात असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत यांनी दिली आहे. बँकेची गरज लक्षात घेऊन व रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रशासन व शासन नियमानुसार पाठपुरावा केला व त्यानुसार बँकेची निकडं लक्षात घेता न्यायालयाच्या निर्देशांनुसार शासनाने पदभर्ती करण्यास मान्यता दिली तेव्हा शासनाचे सहकार आयुक्त यांनी शासनाचे विधी व न्याय विभाग आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरतीची कार्यवाही करावी, असे बँक प्रशासनाला निर्देश दिले. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शासनाचे भागभांडवल नाही, त्यांना आरक्षण अधिनियम २००१ चे नियम लागू होत नाही. असा स्पष्ट निर्वाळा असताना राज्य शासनाचे सहकार आयुक्त पुणे यांचे पत्र क्रमांक १७५९ दिनांक २८ सप्टेंबर २०२१ आणि शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या निर्देशानुसार नोकर भरती संदर्भात बँक प्रशासन सकारात्मक आणि पारदर्शीफणाने कार्यवाही करीत आहे. असे असताना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता काँग्रेसने शब्द पाळला. आरक्षण हटविले, अश्या आशयाच्या खोट्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून बेरोजगार युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)