ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day through Tadoba-Andhari Tiger Reserve)

Vidyanshnewslive
By -
0
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day through Tadoba-Andhari Tiger Reserve)


चंद्रपूर :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील स्वयंसहायता महिला बचत गटामार्फत वने व वन्यजीव संवर्धन संदर्भातील "भरारी" उपक्रम राबविण्यात येत आहे. या समृद्ध वनाचे संवर्धन व संरक्षण पिढ्या न पिढ्या स्थानिक समुदायाने केले आहे. यामध्ये महिलांचे विशेष योगदान आहे. वनावर स्थानिकांचा अधिकार महत्वपूर्ण आहे. म्हणून भरारी सोबतच वनातील आनंदाचा एक दिवस हा आनंददायी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेत स्थानिक बफर क्षेत्रातील महिलांना ताडोबा वनाचे स्थानिक समुदायांच्या आयुष्यातील महत्व, मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी घेण्यात येणारी काळजी, शासकीय व इतर यंत्रणेमार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी या महत्वपूर्ण विषयावर चर्चा व सादरीकरण करण्यात येते आणि स्थानिक महिलांकरिता ताडोबा वनभ्रमंती सुध्दा करण्यात येते. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोहर्ली बफर क्षेत्रातील मोहर्ली या गावातील बचत गटाच्या सहभागाने या उपक्रमाची सुरवात केली. मोहर्ली वनपरिक्षेत्रामध्ये एकूण 10 गावे असून प्रति दिवस एक गाव व 40 महिला यांच्यात सहभाग असणार आहे. असे 98 महिला बचत गटाच्या एकूण 400 महिलांच्या सहभागाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी ताडोबा वन परिक्षेत्रातील 11 गावातील 178 महिला बचत गटाच्या 445 महिला या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. स्थानिक समुदाय या वनाचा महत्वपूर्ण घटक असून वनाचे व वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण हे स्थानिक समुदयाच्या महत्वपूर्ण सहभागने परिपूर्ण होऊ शकते.अशा विविध उपक्रमाअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थानिक समुदयाला पाठबळ देऊन त्यांच्या करिता नावीन्यपूर्ण उपक्रम नियमित राबवित असते. सदर "भरारी" उपक्रम डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी (कोर) यांच्या विशेष योगदानातून राबविण्यात येत आहे. या कार्यकामाचे समन्व्यक व प्रशिक्षक प्रफुल्ल सावरकर, पर्यावरण शिक्षण अधिकारी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आहे. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, संतोष थिपे, श्री. चिवंडे, वनपाल श्री. कामठकर, श्री. सोयाम व श्री. जुमडे तसेच क्षेत्रीय वन कर्मचारी यांचे विशेष योगदान आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)