बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील तीन मित्रांनी आय.आय.टी.मेन्स उत्तम मार्गानी उत्तीर्ण करत ऍडव्हान्स परीक्षेतही घवघवीत यश संपादन केल्याने त्यांच्यावर बल्लारपूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हर्षल नवघरे संचालित आकाश गुरुकुल येथील हे तिघेही विध्यार्थी आहेत. यात सच्चक कांबळे या विद्यार्थ्याने आयआयटी मेन मध्ये 92.31 टक्के गुण घेत 3047 वी रॅंक मिळवली तर फिनिक्स सोनारकर या विध्यार्थ्याने 89.20 टक्के गुण घेत 3954 वी रॅंक मिळवली तर वसंत अटकूरी या विध्यार्थ्याने 74.89 गुण घेत 5726 वी रॅंक मिळवली आहे. महत्वाचे म्हणजे हे तीनही विध्यार्थी 12 परीक्षेतही टॉपर आहेत. हे तिघेही चांगले मित्र असून आकाश गुरुकुल येथील विद्यार्थी आहेत त्यांनी संपादीत केलेल्या यशाने बल्लारपूर शहराचे नाव गौरवान्वित केले आहे. या तिन्ही मित्रांनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकताच या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा स्थानिक गोपाला सेलिब्रेशन हॉल येथे गौरव करण्यात आला... वर्तमान परिस्थितीत समाज माध्यमापासून पासून दूर राहून अभ्यासाचे सातत्य कायम ठेवल्यानेच आपण ही मजल गाठू शकलो, अभ्यासातील प्रखर मेहनत, वेळेचे नियोजन करून अभ्यास केला तर इच्छाशक्ती असलेला विद्यार्थी हे शिखर गाठतो, तेव्हा खूप मेहनत करा यशस्वी हा असा सल्लाही त्यांनी विध्यार्थ्यांना दिला. या विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आकाश गुरुकुलचे संचालक हर्षल नवघरे, आपले आई-वडील, आणी या विद्यार्थ्यांना वेळेवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सोशल इज्युकेशन मोमेन्टच्या जिल्हाध्यक्षा तथा पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा ऍड.योगिता प्रकाश रायपूरे यांना दिले आहे... त्या विद्यार्थ्यांवर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून राज्याचे मत्सव्यवसाय, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री, वन मंत्री, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पवन भगत, इंजि.राकेश सोमाणी, समाजिक कार्यकर्ते सुमित उर्फ गोलू डोहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बादल उराडे, युथ काँग्रेसचे नेते चेतन गेडाम, समाजिक कार्यकर्ते भुरूभाई, राकेश पायताडे गुरुजी इत्यादींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या