18 व्या लोकसभेत दादागिरी ला गांधीगिरी ने प्रत्युत्तर, मतदारांनी केला करेक्ट कार्यक्रम (In the 18th Lok Sabha, Gandhigiri responded to Dadagiri, the voters did the correct program)

Vidyanshnewslive
By -
0
18 व्या लोकसभेत दादागिरी ला गांधीगिरी ने प्रत्युत्तर, मतदारांनी केला करेक्ट कार्यक्रम (In the 18th Lok Sabha, Gandhigiri responded to Dadagiri, the voters did the correct program)


वृत्तसेवा :- लोकसभेचा निकालानंतर कोणी कोणाचा हिशोब केला आणि कोणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला राज्यांच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात काय दिवे लावले त्यांच्या रसभरीत अशा कहाण्या आता लोंका समोर येऊ लागल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघात कोणात्या उमेदवाराला किती मते पडलीत याची आकडेवारी जाहीर झाली आहे. या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघात किती दिवे लावले याची माहिती उघड होऊ लागली. नेत्यांनी ज्या उमेदवारांचा प्रचार केला त्याच उमेदवाराला त्यांच्याच मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही, काहींनी मदत करण्याच्या शपथा घेतल्या, पण ऐनवेळी दगा दिला. अशी अनेक उदाहरणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळालीत. महाराष्ट्रातील चाणक्य म्हणवून घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये या मतदारसंघात नितीन गडकरींना ५५हजार ११६ मताधिक्य मिळाले होते मात्र या वेळी हे मताधिक्य ३३ हजार ५३५वर आले याचा अर्थ फडणवीसांच्या मतदारसंघात भाजप ची मते २१हजार ५८१ मतांनी घटले,या उलट पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी गडकरी यांना ७३ हजारांचे मताधिक्य दिले, याचा अर्थ फडणवीसांचा नागपूर मध्ये करीष्मा घटला,असाच प्रकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कामठी विधानसभा मतदारसंघ येतो त्यात विरोधी उमेदवाराला जास्तीच्या मतांची आघाडी मिळाली. तर मुंबई भाजपचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या आशिष शेलाराच्या मुंबईत सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार विजयी झालेत, या तिघा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याचा हा पुरावा म्हणावा का?असाच प्रकार उदय सामंत मंत्र्यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघांत भाजपचे नारायण राणेंना मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही तेथे उध्दव ठाकरेंच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले.असाच प्रकार बारामती मतदारसंघात पहावयास मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघात शत्रू चा मित्र झालो असे सांगण्याऱ्यांनी सुनेत्रा पवारां नव्हे सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळवून दिले.बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला हा शहरी मतदारसंघ आहे,येथे भाजपचे आमदार आहेत,तेथे मागील २०१९ लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळें च्या विरोधात दिड लाखाचा लीड होता तेथे सुनेत्रा पवारांना २०२४ मध्ये फक्त २१हजार मतांचा लिड मिळाला, दौड विधानसभा मतदारसंघ येथे भाजपचे राहुल कूल आमदार आहेत या ठिकाणी सुप्रिया सुळेंना २५हजार ६८९ मतांची आघाडी मिळाली.पवार कुंटुंबाचे कट्टर विरोधक आमदार संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघात ४१हजार ६२५ मतांची सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली, माजी आमदार अजीत पवारांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात ३४हजार ३८७मतांची सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली. खुद्द अजीत पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.अजीत पवारांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे हर्षवर्धन पाटलांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघात २५ हजार ६८९ मतांची आघाडी सुप्रिया सुळेंना मिळाली, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे आणि अजीत पवार यांच्यात समेट व्हावा या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इंदापूर, पुणे, आणि मुंबईत समेटाच्या बैठका झाल्यात बैठकीत अजीत पवारांना निवडणुकीत मदत करु असा शब्द विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना दिला, पण त्याचा प्रत्यक्षात उपयोग झाला नाही हे सुप्रिया सुळेंना मिळालेल्या मताधिक्यावरून लक्षात येते.बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघ सोडला तर पवार कुंटुंबांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजपच्या आजी माजी आमदारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मतांची आघाडी मिळवून विरोधकांनी अजीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम केला, निवडणूक काळात अजीत पवारांनी दादागिरी च्या भाषेला बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी योग्य असे उत्तर दिले आणि विरोधकांनी आपला हिशोब पुरा केला? महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात अनेकांनी करेक्ट कार्यक्रम करुन वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार, आणि अजीत पवार अशा नेत्यांच्या दादागिरीला त्यांच्याच मतदारसंघातील मतदारांनी गांधीगिरी ने चोख उत्तर दिले, लोकांना गृहित धरले तर काय होते हे त्यांचाच मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले ? बारामती हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल,अशा अनेकांचा अनेक मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम झाला.अनेंकांनी आपला हिशोब पुर्ण करुन घेतला? आता २०२४ च्या आक्टोबर महिन्यात येण्याऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाचा हिशोब आणि कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतील, हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे तोपर्यंत थांबा आणि वाट पहा!!

अतिथी मार्गदर्शक :- अरुण पाटील मो.नं. ९४२०४४३९४४

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)