लोकसभा जागाच्या बाबतीत काँग्रेसचे देशात शतक, महाराष्ट्रातील अपक्ष खासदार विशाल पाटील यांचं काँग्रेसला समर्थन, महाराष्ट्रात काँग्रेसचे 14 खासदार (In terms of Lok Sabha seats, Congress' century in the country, independent MP Vishal Patil from Maharashtra supports Congress, 14 Congress MPs in Maharashtra)

Vidyanshnewslive
By -
0
लोकसभा जागाच्या बाबतीत काँग्रेसचे देशात शतक, महाराष्ट्रातील अपक्ष खासदार विशाल पाटील यांचं काँग्रेसला समर्थन, महाराष्ट्रात काँग्रेसचे 14 खासदार (In terms of Lok Sabha seats, Congress' century in the country, independent MP Vishal Patil from Maharashtra supports Congress, 14 Congress MPs in Maharashtra)


वृत्तसेवा :- सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील यांनी काँग्रेसला आपलं समर्थन जाहीर केलं आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन वाद झाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकून आले. त्यानंतर आज ते दिल्लीत दाखल झाले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे आपलं समर्थन पत्र सोपवलं आहे. यामुळे आता काँग्रेसचं देशात शतक पूर्ण झालं आहे. लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने (Congress) आपलं शतक पूर्ण केलं आहे. इंडिया आघाडीने देशात 233 जागा जिंकल्या असून यामध्ये काँग्रेसच्या 99 जागा होत्या. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यासह आज सकाळी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना काँग्रेसला पाठिंबा असल्याचं पत्र सोपवलं. दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला.विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिल्याने महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या नावे 31 जागा झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. जागावाटप अंतिम झालेलं नसतानाही उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नाराज झाले होते. काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत अखेर काँग्रेसनेही चंद्रहार पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता. पण यामुळे विशाल पाटील यांचे समर्थक नाराज झाले होते. सांगलीत पक्षाची ताकद असतानाही माघार घेतल्याने उघड नाराजी जाहीर कऱण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान सांगली मतदारसंघाचा निकाल लागताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सांगलीबाबत आमची चूक झाली. विशाल पाटील अपक्ष असले तरी आमच्यातीलच आहेत. ते आम्हालाच पाठिंबा देतील. सांगलीमध्ये विकास पाटील जायंटकिलर ठरले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विकास पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)