चंद्रपूर लोकसभेचा ऐतिहासिक निकाल सुधिरभाऊ मुनगंटीवार का हरले? प्रतिभा धानोरकरांच्या विजयाची काय कारणे (Why did Sudhirbhau Mungantiwar lose the historic result of Chandrapur Lok Sabha? What are the reasons for Pratibha Dhanorkar's victory?)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर लोकसभेचा ऐतिहासिक निकाल सुधिरभाऊ मुनगंटीवार का हरले? प्रतिभा धानोरकरांच्या विजयाची काय कारणे (Why did Sudhirbhau Mungantiwar lose the historic result of Chandrapur Lok Sabha? What are the reasons for Pratibha Dhanorkar's victory?)


चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दारुण पराभवाला समोरे जावे लागले. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना तब्बल 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभूत केले. विदर्भात सर्वात मोठ्या फरकाचा हा विजय आहे. तर चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात हा सर्वात मोठा विक्रम आहे. मात्र, या धक्कादायक निकालामागे नेमकी कोणती राजकीय कारणे आहेत ती आपण जाणून घेणार आहोत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर हंसराज अहीर यांची तिकीट कापून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आली. मात्र, जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विरोधात मोठी लाट होती. जिल्ह्यातील शेती ही कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अवलंबून असल्याने हमीभावाचा मुद्दा ग्रामीण भागात पेटलेला. शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी हमीभाव यामुळे शेतकऱ्यांची खदखद ही केंद्र सरकारच्या विरोधात हे वातावरण निर्माण झालं. मोदींच्या एकहाती सत्ता केंद्राचाही इथे मुद्दा होता, त्यामुळे आता दिल्लीत बदल हवा अशी मतदारांची इच्छा होती. मुनगंटीवार यांच्या विरोधात देखील मतदारांत रोष होता.
              सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिआत्मविश्वास नडला. भाजप आणि मोदी लाटेसमोर इतर मुद्दे प्रभावी ठरणार नाही असे गृहीत धरण्यात आले. मात्र प्रत्यक्षात शेतमालाला भाव, उद्योज, रोजगार ह्या विषयांची खदखद मतदार वर्गात होती. त्यांच्या पुढाकाराने 2015 ला जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती, यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र थांबले. दारूचा मोठा काळाबाजार सुरू झाला. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यावर याबाबत टीका होऊ लागली. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामे देखील वादग्रस्त ठरले. जिल्ह्याच मुलभूत विकास सोडून बगीचे आणि इमारतीमध्ये निधी खर्च केला आणि त्याच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. पालकमंत्री असताना त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघात लक्ष देतात अशीही टीका होत होती. एकूणच उमेदवार म्हणून मुनगंटीवार यांच्या बाबत मतदारांमध्ये नाराजी होती. त्यातही मुनगंटीवारांचा अतीआत्मविश्वास देखील नडला. प्रतिभा धानोरकर हे आपल्याला मोठा आव्हान होऊ शकतं हे त्यांनी मानल नाही. देशात मोदींची लाट आहे त्यात आपण निवडून येऊ याबाबत ते आश्वस्त होते. मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत केलेले वक्तव्यामुळे देखील त्यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मदत झाली. विशेषत मोदी यांच्या प्रचार सभेदरम्यान काँग्रेसवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. आणीबाणीच्या दरम्यान ‘काँग्रेसने सख्खे बहीण भावना नग्न करून झोपविले’ असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. हा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आणि सर्वस्तरावर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजपने देखील मुनगंटीवारांच्या या वक्तव्यावर याबाबत मौन बाळगले. यामुळे मुनगंटीवारांच्या विरोधात मोठी वातावरण निर्मिती झाली. भाजपचे पदाधिकारी देखील अतिआत्मविश्वासाने भरलेले दिसले, सामान्य लोकांपर्यंत भाजपचा प्रचार ते पोचवू शकले नाही. एकंदरीत हे सर्व मुद्दे मुनगंटीवार यांच्या विरोधात गेले. मात्र, यात मुनगंटीवार यांना उमेदवार म्हणून नव्हे तर भाजप सरकार नको या मुद्यावर मतदान झाल्याचे दिसून आले. मात्र भाजपविरोधात इतका प्रचंड रोष असेल असे कुणालाच वाटलं नाही. नरेंद्र मोदींची सभा होऊनही मुनगंटीवार आपला पराभव रोखू शकले नाही.
             2019 मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. काँग्रेसमधून निवडून आलेले राज्यातील ते एकमेव खासदार होते. त्यांच्या अकालीन निधनानंतर ही जागा रिक्त झाली. त्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात येणार हे जवळपास निश्चित होते. याबाबत मतदारांमध्ये सहानुभूती होती. मात्र ही सहानुभूती आणखी वाढली जेव्हा चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी दावा केला. वडेट्टीवारांनी देखील शिवानीच्या दाव्याचा समर्थन केलं होतं. त्यामुळे वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला पोहोचला. धानोरकर यांना दिल्लीत जाऊन तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे यामुळे त्यांच्याबबाबत मतदार वर्गामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली. नेमकी तिकीट कुणाला मिळणार याबाबतची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली. प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत मुनगंटीवार हे गाफील राहिले. मात्र धानोकर यांनी पक्ष संघटनेची मोर्चे बांधणी सुरू केली. त्यांच्यावर मुनगंटीवारांनी तिकिटासाठी रडणारी महिला असा आरोप केला होता याला चोख उत्तर धानोरकर यांनी पहिल्या सभेत दिले. ही पहिली सभा दर्गा मैदानात पार पडली. या मध्ये काँग्रेसला मानणारा मतदार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आणि हेच काँग्रेसचे पहिले शक्ती प्रदर्शन होते. त्यातही प्रतिभा धानोरकर यांनी पलटवार करत मुनगंटीवार यांनी एका महिलेचा आणि त्यातही विधवा महिलेचा अपमान केला ‘मी रडणारी नसून लढणारी आहे’ असं जोरदार प्रत्युत्तर त्याला दिलं. या सभेचे चर्चा सर्व लोकसभा मतदारसंघात झाली. यानंतर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर यासंदर्भात अनेक आरोप करत असतानाच धानोरकरांनी यावर प्रत्युत्तर देण्याऐवजी संयम पाळला. पक्ष संघटनेकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. चंद्रपूर जिल्ह्यात कुणबी मतदार हा मोठ्या संख्येने आहे. धानोरकर देखील याच समाजाचे नेतृत्व करतात. याचा मोठा लाभ त्यांना झाला. कुणबी समाजाने एकगठ्ठा मतदान प्रतिभा धानोरकर यांना केले. 2023 मध्ये बाळू धानोकर यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदार वर्गामध्ये त्यांच्याबाबत सहानुभूती देखील दिसून आली. सोबतच शेतकरी वर्गाची मोठी खदखद भाजप विरोधात होती. सामान्य मतदारांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतली अशी स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि कुठलेही पदाधिकारी पोहोचले नसताना देखील ग्रामीण भागात मात्र काँग्रेसची मोठी लाट निर्माण झाली. एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि अनुकूल वातावरण होते आणि भाजप विरोधात मोठी लाट होती त्यामुळे काँग्रेसला प्रचार करण्याची देखील गरज पडली नाही आणि आतापर्यंतच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांना पराभूत केलं

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)