बल्लारशाह वनपरीक्षेत्रातील रोपवनात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन (Environment Day by Plantation of Trees in Sapling Forest in Ballarshah Forest Zone)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह वनपरीक्षेत्रातील रोपवनात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन (Environment Day by Plantation of Trees in Sapling Forest in Ballarshah Forest Zone)


बल्लारपूर :- दिनांक 05 जुन 2024 पर्यावरण दिनानिमित्त बल्हारशाह वनपरिक्षेत्रात सन 2024 चे पावसाळया करीता प्रस्तावित असलेले मिश्र रोपवन 2024 कक्ष क्रमांक 451 मानोरा, मिश्र रोपवन 2024 कक्ष क्रं. 446 उमरी व मिश्र रोपवन 2024 कक्ष क्रमांक 578 विसापुर 1 येथे वृक्षारोपन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. मानोरा येथील मिश्र रोपवनात सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश भोवरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, मानोरा अध्यक्ष श्री. अमोल ढोंगे, सामाजिक कार्यकर्ता श्री. रमेश पिपरे यांचे शुभ हस्ते वृक्षारोपवन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी व कामावरील मजुर उपस्थीत होते. त्यानंतर उमरी येथील मिश्र रोपवन कक्ष क्रं. 446 येथे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश भोवरे, ग्राम पंचायत, उमरी पोदार सरपंच श्रीमती. लेणगुरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, उमरी तुकुम अध्यक्ष श्री. परचाके, उमरी पोतदार अध्यक्ष श्री. देवईकर व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला विसापुर येथे मिश्र रोपवनात ग्राम पंचायत, विसापुर सरपंच सौ. वर्षा कुळमेथे, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह श्री. कोमल घुगलोत, वनरक्षक कु. वर्षा पिपरे व सुधीर बोकडे यांनी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील मौजा कारवा, किन्ही व कळमणा मध्ये वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यारण दिवस साजरा केला. नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)