बल्लारशाह वनपरीक्षेत्रा अंतर्गत कळमना नियतक्षेत्रात ससा या प्राण्याची शिकार करतांना 7 व्यक्ती विरोधात वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल (A case under the Wildlife Act has been registered against 7 persons while hunting rabbit in Kalmana area under Ballarshah forest range.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह वनपरीक्षेत्रा अंतर्गत कळमना नियतक्षेत्रात ससा या प्राण्याची शिकार करतांना 7 व्यक्ती विरोधात वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल (A case under the Wildlife Act has been registered against 7 persons while hunting rabbit in Kalmana area under Ballarshah forest range.)


बल्लारपूर :- दिनांक 05.06.2024 रोजी नियतक्षेत्र कळमणा अंतर्गत येत असलेल्या मौजा पळसगांव तेंदु गोडावुन परिसरात सस्यांची वाघरी लावुन शिकार होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहितीचे आधारे पळसगांव येथील तेंदु गोडावुन मागील परिसरात सापडा रचुन आरोपी नामे 1). दिलीप रामा मेश्राम, वय 37 वर्षे, रा.गोंगले, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, 2) राजु काशीराम मेश्राम, वय 39 वर्षे, रा.उमरी, तह.साकोली, जि.भंडारा, 3) भोजराम शंकर कोल्हे, वय 34 वर्षे, रा.सोंदळ, तह.सडक अर्जुनी, जि.गोंदिया, 4) विनोद रामकृष्ण बेंडवार, वय 42 वर्षे, रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, 5) सुभाष वासुदेव चन्ने, वय 44 वर्षे, रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, 6) पुरुषोत्तम मोतीराम वलथरे, वय 45 वर्षे, रा. किन्ही, तह.साकोली, जि. भंडारा, 7) फागु पांडुरंग शेन्डे, वय 50 वर्षे, रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा यांना एक जिवंत ससा (जखमी अवस्थेत) व वन्यप्राणी शिकारीचे फासे सह ताब्यात घेतले व जखमी सस्याला उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान सदर दिनांक ०६.०६.२०२४ ला मृत पावला. वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी सस्याचे मास खाण्याकरीता ससाची शिकार केल्याची कबुली दिली. वरील सर्व आरोपी 1 ते 7 विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2,9, 39, 44, 51 व 52 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08945/223620 दिनांक 05.06.2024 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला व त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, बल्हारपुर येथे हजर करण्यात आले. वनविभागा मार्फत सरकारी वकील अॅडव्होकेट श्रीमती. संगीता डोंगरे हे सदर प्रकरण पाहत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक, श्री.बी.टी.पुरी, वनरक्षक श्री. परमेश्वर आनकाडे, श्री. सुनिल नन्नावरे, श्री. मनोहर धाईत, कु. भारती तिवाडे व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)