नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील मित्र पक्षांची उपेक्षा का केली? मंत्री पदासह निधी वाटपातही उपेक्षा (Why did Narendra Modi ignore the allied parties in Maharashtra? Negligence in allocation of funds including ministership)

Vidyanshnewslive
By -
0
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील मित्र पक्षांची उपेक्षा का केली? मंत्री पदासह निधी वाटपातही उपेक्षा (Why did Narendra Modi ignore the allied parties in Maharashtra? Negligence in allocation of funds including ministership)


वृत्तसेवा :- बहुमताचे आकडे कमी आल्या मुळे या वेळी नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ कसे असणार असेल या कडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं पण या मंत्रीमंडळात मित्र पक्षांच्या हातांमध्ये मोंदी शहांनी हाती खुळखुळा दिला की काय अशी स्थिती आहे त्यात ही सर्वात दयनीय अवस्था कोणत्या मित्र पक्षाची झाली असेल तर ती महाराष्ट्रांतील मित्र पक्षांची झाली आहे, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (पवार) पक्षाला मंत्रीमंडळात स्थान नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे च्या गटाला कबीनेट मंत्रीपद मिळालेलं नाही.त्या ऐवजी स्वंत्रत पदभार असलेलं राज्य मंत्री पद देण्यात आले आहे रविवारी भाजप आणि मित्र पक्षांच्या एनडीए आघाडीच्या सरकारचा मंत्रीमंडळळाचा शपथविधी झाला या मंत्रीमंडळात एकुण ७१ खासदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली त्यात भाजपचे ६० खासदारानी आणि उर्वरित ११ मित्र पक्षांच्या खासदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली यावरून असे प्रश्न निर्माण होतात की हे मंत्रिमंडळ एनडीए च आहे की भाजपचे वरचष्मा दिसतो महाराष्ट्रातील मित्र पक्षांच्या वाटेला फक्त दोन मंत्री पदे मिळ्यालीत त्यातही कबीनेट मंत्री पद मिळालेलं नाही शिंदे सेनेचे सात खासदार निवडून आले असले तरी शिंदे गटाला फक्त एकच तेही स्वतंत्र पदभार असलेले राज्य मंत्री पद मिळाले आहे आणि आठवले गटाचा एक ही खासदार निवडून आला नाही तरी त्या गटाचे रामदास आठवले यांना राज्य मंत्री देण्यात आले आहे या मंत्रीमंडळात सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्राची केलेली आहे, मागच्या मंत्रीमडळामध्ये महाराष्ट्रातून एकुण आठ मंत्री होते ह्या वेळच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रात फक्त सहा मंत्री आहेत या वेळी आकडा दोन ने कमी झालेला आहे, चंद्रा बाबू नायडू यांचे १६ खासदार आहे आणि नितीशकुमार याचे १२ खासदार आहेत यांना एक कबीनेट आणि एक राज्य मंत्री पद अशी दोनच पदे मिळाली आहेत, एकनाथ शिंदे गटापेक्षा कमी खासदार असलेले तीन पक्षांना एक एक कबीनेट मंत्री पदे मिळाली आहेत त्या मानाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे च्या सात खासदारांना मात्र एकच जे स्वतंत्र पद भार असलेलं राज्यमंत्री पद दिले आहे त्यांच्या कडे खाते कुठलं दिले आहे तर आयुष खाते ज्याची फारशी माहीती कोणाला नाही शिवाय हे खाते निधी च्या दृष्टीने फारसं मोठं नाही त्याची फारशी चर्चा ही होत नाही अशा खात्यावर एकनाथ शिंदे च्या गटाची बोळवण केली आहे. एकनाथ शिंदे पेक्षा कमी असलेल्या चिराग पासवान यांचे पाच खासदार आहेत त्यांना एक कबीनेट मंत्री पद मिळाले आहे, टी डी एस पक्षाचे दोनच खासदार आहेत, त्यांना सुध्दा एक कबीनेट मंत्री पद मिळाले आहे. जितेन्द्र सिंह मांझी एकच खासदार आहे तरी सुध्दा त्यांना एक कबीनेट मंत्री पद मिळाले आहे.जयंत चोधरी आर आर डी पक्षाचे आहेत त्यांचे दोनच खासदार आहेत तरी त्यांना स्वतंत्र पद भार असलेलं राज्य मंत्री पद मिळाले आहे म्हणजे जे एकनाथ शिंदे च्या सात खासदारांना मिळाले तेच पक्षाचे दोन खासदार असलेल्या जयंत चौधरींना मिळाले आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजीत पवार यांची भाजपसाठी उपयुक्तता संपलेली आहे का? लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजीत पवार यांना सोबत घेतल्यास भाजपला ४५ पर्यत चा आकडा गाठता येईल असे गणित भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मांडले पण शिंदे पवारांना सोबत घेऊन ही भाजपला अपेक्षित असे यश लोकसभा निवडणुकीत मिळवता आले नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने आखलेला मास्टर प्लान पुर्णपणे फसला आहे, भाजप २३ वरुन थेट ९ वर आला आहे, महाराष्ट्रातील भाजपचे केलेलं फोडाफोडी चे राजकारण जनतेला आवडलेलं नाही, भाजपचे मास्टर प्लान फसण्याची शिक्षा मात्र शिंदे आणि पवारांना मिळाली आहे महाराष्ट्रात भाजपचे ९ खासदार असूनही भाजपला मात्र चार मंत्री पदे बहाल केली आहेत यात एकनाथ शिंदे ना लोकसभेत सात खासदार निवडून सुध्दा केंद्रीय मंत्रीमंडळात एकच तेही राज्य मंत्री पद मिळाले आहे अजीत पवारांना भाजपाने देऊ केलेलं राज्यमंत्री पद अजीत पवारांच्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या अंतर्गत वादामूळ हातचे गेलं असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अजीत पवारांना पाच जागे पैकी एकाच जागेवर विजय मिळविता आला आणि अजीत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहीत चार जागेवर पराभवाचे तोंड पाहावे लागले, एकनाथ शिंदे नी १५ जागा लढवून त्यांचे सात खासदार निवडून आले एकनाथ शिंदेंनी नाही म्हटले तरी चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या पदरी एकच राज्य मंत्री पद मिळाले आहे अजीत पवारांची अवस्था अशी आहे की लोकसभेत पराभव पत्करावा लागला शिवाय आपसातील भांडणामुळे भाजपने देऊ केलेलं राज्य मंत्री पद सुध्दा घालवून बसले म्हणजे तेल ही गेले तूप ही गेले हाती थोपाटणं आले अशी अवस्था अजीत पवार गटाची झाली आहे, प्रफुल्ल पटेलांना या पुर्वी शरद पवारांच्या आशिर्वादाने काही ही न करता मंत्री पद मिळायचे या वेळी मात्र सुनील तटकरेंनी केलेल्या अडवणुकी मुळे प्रफुल्ल पटेलांना मंत्री पद मिळाले नाही, त्या मुळे प्रफुल्ल पटेल नाराज झाले आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ शपथविधी ला गैरहजर राहिले,यात विशेष गोष्ट म्हणजे भाजपला विना शर्त पाठींबा देऊन भाजपच्या उमेदवारांसाठी नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या त्या राज ठाकरेंना मंत्रीमंडळ शपथविधी च्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण सुध्दा दिले नाही,हे चित्र पाहिल्यावर कदाचित महाराष्ट्रातील भाजप आणि मित्र पक्षांने अपेक्षित असे यश मिळवून दिले नाही म्हणून नरेंद्र मोदींनी कमी मंत्री पदे दिली, असे जर असेल तर मग उत्तर प्रदेशात सुध्दा भाजपला महाराष्ट्रा इतक्या जागा कमी मिळाल्या असल्या तरी नरेंद्र मोदींनी मात्र उत्तर प्रदेशाला एकुण अकरा मंत्री पदे बहाल केलेली आहेत म्हणजे उत्तर प्रदेशात भाजपला कमी जागा मिळवून सुध्दा अकरा मंत्री आहेत महाराष्ट्रात मात्र केवळ सहा मंत्री पदे दिली महाराष्ट्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही या मुळे नरेंद्र मोदींनी असे केले असावे का? केद्रीय मंत्री मंडळात महाराष्ट्राच्या वाटेला कमी मंत्री पदे मिळालीत ह्याचा भविष्यात महाराष्ट्रातील होण्याऱ्यां विधानसभेच्या निवडणुकीवर परीणाम करणारा ठरेल का? भाजप आपल्या मित्र पक्षांना जागा वाटपातील योग्य असा वाटा देईल का? आम्हाला योग्य असा वाटा मिळाला पाहिजे या वरुन टीका टिप्पणी महायुतीत सुरू झाली आहे, चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत आता पासून कुरबुरी सुरू झाल्या आहेत शिंदे आणि अजीत पवार हे अधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रही भूमिका घेतात का? किंवा केंद्रीय मंत्रीमंडळात नरेंद्र मोदींनी मित्र पक्षांच्या हाती खुळखुळा दिला तसे भाजप महाराष्ट्रात मित्र पक्षांच्या हाती खुळखुळा देईल का? अशी जनमाणसात चर्चा सुरु आहे.

अतिथी मार्गदर्शक - अरुण पाटील मो. 9420443944

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)