दुचाकी चोरी व घरफोडी प्रकरणी आरोपीना बल्लारपूर पोलिसांकडून अटक (Ballarpur police arrested the accused in the case of two-wheeler theft and burglary)

Vidyanshnewslive
By -
0
दुचाकी चोरी व घरफोडी प्रकरणी आरोपीना बल्लारपूर पोलिसांकडून अटक (Ballarpur police arrested the accused in the case of two-wheeler theft and burglary)


बल्लारपूर :- ८ जुन रोजी येथील नवीन बस स्टँड वरून रविंद्र कवडू शिडाम यांची दुचाकी क्र. MH ३४ BW ८७९३ चोरी गेली होती. त्यांनी १० जुन रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. याची दखल घेत पोलीसांनी पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात चक्र फिरवून आरोपी किशोर श्यामराव त्रिसुलवार (२८) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर याच्या मुसक्या आवळल्या. बल्लारपूर पोलीसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडीचे आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून तीन आरोपींना अटक केले आहे.

 
           विद्या नगर येथील राजू महादेव पिंपळकर आपल्या परिवार सोबत बाहेर गावी गेले असता त्यांचा घरी अज्ञात चोराने घरच्या दरवाजाची कुंडी तोडून एक ग्राम सोन्याची नथ, ३ चांदीचे शिक्के, १० ग्राम चांदीचे कुयरी व ६ हजार रुपये नगदी चोरी केले होते. राजु पिंपळकर यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या वरून पोलीसांनी गुन्हा नोंद केले. पोलीसांनी तक्रारीची नोंद घेत आरोपी तिरूपती उर्फ लड्या अशोक दासरवार (२७) रा. गौरक्षन वार्ड व ऋतिक विठ्ठल उपरे याला अटक करून मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, सफौ गजानन डोईफोडे, पोहया. सुनिल कामटकर, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा, रणविजय ठाकूर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, वशिष्ट रंगारी, सरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)