मामाच्या मुलींसाठी दोन सख्ख्या भावात कपडे फाटेपर्यंत हाणामारी, मात्र मुलीनं तिसऱ्याच मुलाला विवाहासाठी निवडलं (Two brothers fight for uncle's daughters until their clothes are torn, but the girl chooses the third neighbor's son for marriage.)
जळगाव :- आपल्या मुलानं आपल्या भावाची मुलगी घरात सून म्हणून आणावी, अशी अनेक बहिणीची इच्छा असते. मात्र, जळगावमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी बहिणीने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाचं घर गाठलं. मामाची मुलगी पसंत असल्याचं सांगत मोठ्या मुलाने लगेचच होकार दिला. इतक्यात लहान भावालाही मनात धकधक झालं आणि आपल्यालाही ती पसंत असल्याचं त्यानं सांगितलं. लहान भाऊ म्हणाला, की मी लग्न करेन तर तिच्याशीच. यानंतर या कहाणीत वेगळाच ट्विस्ट आला. याच कारणावरुन दोन्ही भाऊ आपसात भिडले, त्यांनी अगदी कपडे फाटेपर्यंत एकमेकांसोबत हाणामारी केली. मात्र, सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नंतर आला. भावांची भांडणं पाहून मामाच्या मुलीनेही आपले पत्ते उघडले. तिने सांगितलं की तिचं तिसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे. हे ऐकून दोन्ही भावांना मात्र धक्काच बसला. ही अजब घटना जामनेरमधून समोर आली आहे. बाहेर राज्यात राहणारी एक महिला शनिवारी जामनेरमध्ये राहणाऱ्या आपल्या भावाची मुलगी पाहण्यासाठी आली होती. आपल्या मुलाने भावाच्या मुलीशी लग्न करावं, असं तिला वाटत होतं. म्हणून तिने आपली दोन्ही मुलंही सोबत आणली. भावाकडे पोहोचून महिलेनं आरामात जेवणही केलं. यानंतर तिने मोठ्या मुलासाठी भावाकडे त्याच्या मुलीची मागणी केली. मोठ्या मुलानेही लग्नाला होकार दिला. मात्र, मामाची मुलगी पाहताच लहान भावाच्या मनातही तिच्याबद्दल भावना जाग्या झाल्या मात्र मुलीने सांगितलं, की तिचं गल्लीतील दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. यानंतर महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रिकाम्या हातीच आपल्या घरी परतली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या