अखेर बामणी प्रोटीन फॅक्टरी आजपासून बंद, शेकडो मजुरावर बेरोजगारीचे संकट (Finally, Bamni Protein Factory is closed from today, unemployment crisis for hundreds of workers)
बल्लारपूर :- बल्लारपूर मतदार संघात उद्योगाला घरघर लागली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मग तो भीवकुंड जवळचा कारखाना असो की बल्लारपूरातील कवेलू कारखाना व सद्यस्थितीत बामणी गावाजवळ असलेल्या बामणी प्रोटीन लिमिटेड कारखान्याला प्रदूषणाच्या कारणांखाली १८ मे ला ताले ठोकण्यात आले असून कामगारांना १९ मे पासून कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांचे पगार व इतर देय रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करून देण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. कंपनीच्या वतीने नोटीस जारी करून, सर्व कामगार आणि अनौपचारिक मजुरांना २१ जुलै २०२४ पर्यंत त्यांचे पगार, इतर भरपाई आणि थकबाकीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वेळेवर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. १८ मे पासून कारखाना बंद आहे. जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या तक्रारीवरून एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भगले यांनी १३ मार्च ला बामणी प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सर्व कामगारांनी १९ मे पासून ड्युटीवर हजेरी लावली नाही. त्यानंतर एजीएम (पीआरए), सीएल, बीपीएलच्या परवानगी शिवाय कोणत्याही कामगाराला कारखान्यात प्रवेश करता येणार नाही. या संदर्भात बामणी प्रोटीन्स प्रा. लि. एचआर विभागाचे सतीश मिश्रा म्हणाले की, बामणी प्रोटीन लिमिटेड कारखाना आजपासून कायमचा बंद आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या