दुपारी जेवणाची सुट्टी घेणे बँकेला चांगलेच पडले महाग, RBI च्या निर्देशानुसार बँकेला मागावी लागली माफी (Taking a lunch break in the afternoon cost the bank dearly, the bank had to seek an apology as per RBI directives)
वृत्तसेवा :- काही दिवसापूर्वी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते श्री प्रशांत शरद पुजारी रा. गारगोटी हे दुपारी त्यांच्या एटीएम कार्ड संबंधातील एका कामासाठी सदर शाखेत गेले असता पूर्ण बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आपापल्या कामाच्या जागेवर नसल्याचे दिसले. उपस्थित ग्राहकांना आणि सिक्युरीटी गार्डना विचारले असता सर्व अधिकारी/कर्मचारी जेवायला गेल्याचे त्यांना समजले. त्यावेळी बँकेत बरेच ग्राहक ताटकळत कर्मचाऱ्यांची वाट बघत बसल्याचे दिसले. पूर्ण बँकच रिकामी बघून श्री प्रशांत पुजारी यांनी शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जाऊन सदर बाब सांगायला गेल्यावर तिथे शाखा व्यवस्थापक ही त्यांच्या केबिन मध्ये उपस्थित नव्हते. वास्तविक RBI नियमानुसार बँकेला दुपारच्या जेवणाची पूर्ण सुट्टी नसते. ग्राहकांच्या सेवेसाठी किमान एक तरी कर्मचारी ड्युटीवर असावा लागतो. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गारगोटी, तालुका भुदरगड ही एक कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवरील मोठी शाखा आहे. या शाखेत दररोज नेहमी गर्दी असते आणि पूर्ण तालुक्यातील शेकडो ग्राहक विविध कामासाठी येत असतात. सदर शाखेतील कर्मचारी अधिकारी यांची बेफिकिरी बघून श्री प्रशांत पुजारी यांनी सरळ RBI ला मेल करून सविस्तर पुराव्यासह रीतसर तक्रार केली. RBI कडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी बँकिंग ओंबड्समन यांच्याकडे तक्रार पाठवली. ओंबड्समन यांनी SBI च्या महाव्यवस्थापक यांना यासंदर्भात नोटीस पाठवून सविस्तर खुलाशासह कार्यवाही करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर sbi च्या अती वरिष्ठापासून ते शाखा व्यवस्थापक पर्यंत बँकेतील सर्व सूत्रे पटापटा हलली. गारगोटी शाखा व्यवस्थापक यांनी बँकेत ताबडतोब स्टाफ मीटिंग घेवून पुन्हा अशा चुका होऊ नयेत आणि ग्राहकांच्या सेवेच्या बाबतीत हयगय होणार नाही अशा प्रकारचा सक्त ताकीद देणारा कार्यालयीन आदेश काढला आणि तुम्हाला तसेच इतर ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागत आहोत असा फोन करून श्री प्रशांत पुजारी यांना सांगितले आपल्या गावातील, शहरातील कोणत्याही बॅंकेच्या एखाद्या शाखेत असा प्रकार आढळला तर आपणही तक्रार करुन न्याय मिळवून शकतो , त्यासाठी आपण बॅंकेच्या शाखेत तक्रारीसाठी वरीष्ठ अधिकारी यांचा किंवा विभागातील मुख्य शाखेचा तक्रार दाखल करण्यासाठी मोबाईल नंबर किंवा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या