रेल्वे क्वार्टर समोर फुटपाथ समोर अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Body of unidentified person found on footpath in front of railway quarter, Ballarpur police appeal for identification)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- पोस्टे बल्लारपूर येथे आज दिनांक 18/05/24 रोजी बल्लारशाह रेल्वे स्टेशन मास्टर कडून एक मेमो प्राप्त झाला असून त्यानुसार एक अनोळखी व्यक्ती अंदाजे 50-55 वर्षांचा अनोळखी पुरूष, अंदाजे 5.5 फुट उंचीचा, सडपातळ बाधां, अंगात पांढरा शर्ट व मळकट पांढरा पॅंट असलेला, रेल्वेच्या काॅर्टरचे समोर फुटपाथवर मृतावस्थेत मिळाला आहे. सदर मृतक हा या परीसरात १ महीण्यापासुन फिरत होता. व या परीसरात भिक मागत होता. तो गेल्या 15 दिवसापासुन आजारी असल्याची माहिती असून फुटपाथवर एकाच ठिकाणी अंदाजे 15 दीवसापासून पडून होता, त्याला अटोचालक तसेच वाटसरु अन्न व पाणी देत होते. तो आज कसल्यातरी आजाराने मरण पावला आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी विनंती आहे कि, सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन सपोनि प्रविण तळी पोस्टे बल्लारपूर यांनी केले असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)