बल्लारपूरात बुध्द जयंती निमित्ताने " बुध्द पहाट व धम्म प्रबोधनाचे " आयोजन ("Buddha Pahat and Dhamma Enlightenment" organized on the occasion of Buddha Jayanti in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात बुध्द जयंती निमित्ताने " बुध्द पहाट व धम्म प्रबोधनाचे " आयोजन ("Buddha Pahat and Dhamma Enlightenment" organized on the occasion of Buddha Jayanti in Ballarpur)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा पाली बुद्ध विहार समोरील पटांगणावर भव्य बुद्ध जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दि. 22 मे ला साय.6.30 वा. धम्म प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचारी रत्ननायक, डॉ ललित बोरकर यवतमाळ, धम्ममित्र भास्कर भगत, यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच 23 मे 2024 ला बुद्ध पौर्णिमेच्या पहाटे, 5.30 वा. बुद्ध पहाट दिव्यांग सांस्कृतिक व पुनर्वसन संस्था अकोला यांच्या कलाकारांच्या वतीने बहारदार संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी तमाम जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करून येण्याचे करावे असे आवाहन समिती द्वारे करण्यात आले आहे. यासोबतच बुध्द पौर्णिमा समारोह समिती च्या वतीने 23 मे रोजी सायंकाळी 6:00 वा. कला मंदिर च्या भव्य रंग मंचावर बुध्द जयंती निमित्ताने मार्गदर्शन व भूपेश सवाई यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)