बल्लारपूर :- गेल्या अनेक दशकांच्या परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपूरच्या वतीने याही वर्षी 23 मे 2024 रोजी "तथागत भगवान गौतम बुद्ध" जयंती मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. बीपीएम कलामंदिरच्या खुल्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. प्राचार्य डॉ.सुभाष खंडारे (वर्धा) यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करून व्याख्यान दिले. भगवान बुद्ध आणि बुद्ध पौर्णिमा या विषयावरील व्याख्यानात त्यांनी बुद्ध धम्माची श्रेष्ठता आणि बुद्धाच्या काळातील इतिहासावर प्रकाश टाकला. रितेश बोरकर यांनी प्रास्ताविकाद्वारे समितीची भूमिका मांडली. समितीचे अध्यक्ष विश्वास देशभ्रतार यांनी अध्यक्षीय भाषण केले. श्रीनिवास मासे यांनी सूत्रसंचालन केले! यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे अंतर्गत भूपेश सवाई (नागपूर) यांनी त्यांच्या चमू सह बुद्ध भीम गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे सरचिटणीस वसंत मांढरे ढरे यांनी बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भीम शक्ती फाउंडेशन बल्लारपूर तर्फे उपस्थित प्रेक्षकांना “आंब्याचा रस” वाटप करण्यात आला. आभार अधिवक्ता पवन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाची माहिती आकाशकांत दुर्गे, बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीचे सरचिटणीस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या