महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे बल्लारशाह किल्ला येथे अभ्यास दौरा (Study tour to Ballarshah Fort by History Department of Mahatma Jyotiba Phule College)
बल्लारपूर :- महात्मा ज्योतीबा फ़ुले महाविद्यालय बल्लारपूर येथील गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत इतिहास विभागाद्वारे बी. ए. भाग तीनच्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना "बल्लारपूर शहराचा इतिहास- एक ऐतिहासिक अध्ययन" या विषयावर गोंडवाना विद्यापीठाला प्रोजेक्ट सादर करावयाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना डॉ. किशोर चौरे, इतिहास विभागप्रमुख यांनी बल्लारपूर येथील गोंड कालीन किल्याला भेट देण्यात आली. डॉ. किशोर चौरे यांनी विद्यार्थ्यांना बल्लारशाह किल्याविषयी, गोंड कालीन राज्यांविषयी सविस्तर माहिती सांगितली, तसेच बल्लारपूर शहरातील इतर वास्तूंविषयी बारीक-सारीक माहिती विद्यार्थ्यांना दिली, जी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा प्रोजेक्ट तयार करण्यास उपयुक्त ठरली. या अभ्यास दौऱ्याला प्रा. दीपक भगत, प्रा. राजेंद्रकुमार साखरे व इतिहास विषयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments