एकेकाळी स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेले बल्लारशाह रेल्वेस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात (Ballarashah Railway Station, which was once awarded for cleanliness, is in the grip of unsanitary conditions)

Vidyanshnewslive
By -
0

एकेकाळी स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेले बल्लारशाह रेल्वेस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात (Ballarashah Railway Station, which was once awarded for cleanliness, is in the grip of unsanitary conditions)


बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्य रेल्वेचे महत्वाचं स्थानक म्हणून ओळखलं जात शिवाय दक्षिणपूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वे व मध्य रेल्वेच एक महत्वाचं जंक्शन म्हणुन सुध्दा ओळख आहे इथून महाराष्ट्राची सीमा संपतेय व तेलंगाना राज्याची सीमा सुरु होतेय एकेकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशपातळीवरील स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता लाखो रुपये खर्चून या रेल्वे स्थानकावर सौदर्यीकरण करण्यात आले मात्र सद्यस्थितीत याच रेल्वे स्थानकावर अस्वच्छतेचा कळस गाठला की काय असा प्रश्न निर्माण होतोय एखादा वरिष्ठ अधिकारी येणार असला की रेल्वे स्थानकाच रुपडं पालटलं जातंय नववधू सारखं रेल्वे स्थानकाला सजविला जातंय मात्र अधिकाऱ्यांनी पाठ फिरविताच बल्लारपूर रेल्वे स्थानक आपल्या पुर्व स्थितीत येतें नुकतीच 30 मार्चला मध्य रेल्वे मुंबईचे  महाप्रबंधक श्री नरेश लालवानी यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकाला भेट देतांना अधिकाऱ्यांशी प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी येणार या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी रेल्वेस्थानक स्वच्छ व चकाचक करण्यात आले होते मात्र अधिकाऱ्यांनी पाठ फिरविताच रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे चित्र आहे त्यामुळं प्रवाशांनाही विचार पडला की स्वच्छतेचा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविणारे हेच बल्लारशाह रेल्वे स्थानक आहे की काय असा प्रश्न पडला या संदर्भात बल्लारपूर बिजनेस असोसिएशन चे अध्यक्ष नरेश मुंधडा म्हणतात की, प्रवाशाकडुन भरमसाट पैसे आकारले जातात मात्र आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही तसेच वरिष्ठ अधिकारी दाखल होणार असले की ज्या प्रमाण स्वच्छता केली जाते तशीच स्वच्छता कायम केली पाहिजे. कोरोनाच्या संक्रमण काळात आमच्या हक्काची सेवाग्राम एक्सप्रेस बंद करण्यात आली ती अजूनही बंद अवस्थेत आहे त्यामुळं मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच झेडआरयुसीसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार आपलं मत व्यक्त करतांना म्हणतात की, बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेचे कंत्राट दरवर्षी लाखो रु खर्चून खाजगी कंत्राटदाराला दिले जातात तरीही बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अस्वच्छता दिसून येतें या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं ही त्यांनी म्हंटले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)