महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आधारकार्ड शिबीराचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule College Ballarpur History Department Organized Aadhaar Card Camp)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आधारकार्ड शिबीराचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule College Ballarpur History Department Organized Aadhaar Card Camp)

बल्लारपूर - बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील इतिहास विभाग नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध उपक्रम राबवीत असतात, त्याच अनुषंगाने डॉ. किशोर चौरे (इतिहास विभागप्रमुख) यांनी महाविद्यालयामध्ये दि. 24 ते 26 एप्रिल या कालावधीत आधारकार्ड शिबीराचे आयोजन केले. विशेष म्हणजे आधार कार्ड हे शासनाच्या विविध योजनेत कामी येत असते त्यामुळं आधार कार्ड अभावी कोणतीही अडवणूक होऊ नये म्हणुन या तीन दिवशीय आधारकार्ड शिबिरामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आधारकार्डचे नूतनीकरण केले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांनी सुध्दा आधारकार्डचे नूतनीकरण केले, या शिबिराला यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर  व कनिष्ठ महाविद्यालयील प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललीत गेडाम, प्रा. सविता पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)