महाकाली यात्रेत वृत्त वाहिनीच्या पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याची डिजिटल मिडिया असोसिएशनची मागणी, लवकरच चौकशी करून दोषींवर कारवाई करू - रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधिक्षक चंद्रपूर (Digital Media Association demands suspension of Police Sub-Inspector who assaulted news channel journalists during Mahakali Yatra, we will investigate soon and take action against the culprits - Ravindra Singh Pardeshi, Superintendent of Police Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे प्रशिक्षार्थी पत्रकार नेमन धनकर आणि सुनिल देवांगण हे यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना आंघोळीची पुरेसी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे उघड्यावर व अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करीत असतांना व्हिडीओ शुटींग करीत असतांना सब इन्स्पेक्टर मिलिंद गेडाम यांनी त्यांची कोणतीही विचारणा न करता त्यांना मारहाण केली व महाकाली मंदिर परिसरात पोलिस विभागाने स्थापित केलेल्या चौकीमध्ये या दोन ही पत्रकारांना घेऊन जाऊन त्याठिकाणी त्यांचेपाशी ओळखपत्र असुन सुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली, याची माहिती पार्थशर समाचार चे मुख्य संपादक राजेश नायडु यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष या चौकीला भेट देवून सदर पत्रकार हे पार्थशर समाचार साठी वृत्त संकलन करीत होते व त्यामुळे त्यांनी व्हिडीओ शुट करणे भाग असल्यामुळे ते व्हिडीओ शुट करीत असल्याचे प्रत्यक्ष सांगीतल्यानंतर सुद्धा गेडाम यांनी पत्रकाराजवळील मोबाईल हिसकावून घेऊन व्हिडीओ डिलीट केले, पोलिसांची पत्रकारांशी केलेली वागणुक ही निंदनीय आहे. पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देणारे पोलिस अधिकारी मिलिंद गेडाम  यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी पत्रकार संघातर्फे आज दि. ६ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे पत्रकार यांना सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांनी विनाकारण मारहाण केली, त्या सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांना निलंबित करण्याची मागणी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पोलिस अधिक्षकांना देण्यात आले. यावेळी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ चे अध्यक्ष मझहर अली, डिजिटल मीडिया एसोसिएशन चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, आशिष अंबाड़े, सारंग पांडे, राजेश सोलापन, सुनील तायड़े, विजय सिद्धावार, जितेंद्र जोगड, राजू बित्तुरवार, दिनेश एकवोंकर, राजेश नायडू, हिमायु अली, होमदेव तुम्मेवार, मोरेश्वर उधोजवार, मनोहर दोतपेल्ली, तुलशीराम जाम्बुलकर, गणेश अडूर, करण कंदूरी, प्रशांत रामटेके, शंकर महाकाली, धम्मशील शेंडे, गौरव पराते, सुनील गेडाम आदि पत्रकारांची उपस्थिती होती. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)