पुरोगामी विचारवंतांच्या जयंती निमित्ताने बल्लारपुरात दोन दिवसीय प्रभोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (A two-day enlightenment program was organized in Ballarpur on the occasion of the birth anniversary of the progressive thinker)
बल्लारपूर :- चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित जयंती उत्सव समिती बल्लारपूर द्वारे भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन जय भीम चौक, विद्यानगर वार्ड येथे ८ व ९ एप्रिल ला करण्यात आले आहे. शनिवार ८ एप्रिल सकाळी ११ वाजता मा. बाळुभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्र यांच्या हस्ते डॉ. सौ. स्मिता निशिकांत मेहेत्रे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, मधू बावलकर ज्येष्ठ साहित्यिक तेलंगाणा, नाना बुंदेल ट्रान्सपोर्ट व्यावसिक, सुमित (गोलू) डोहने सामाजिक कार्यकर्ता, राकेश सोमाणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर राहणार आहेत. या वेळी मा. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचं सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर लगेच शालेय विद्यार्थी करीता महापुरुषांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षा चे आयोजन करण्यात आले आहेत. " मेंदूचे व्यवस्थापन हेच जीवनाचं व्यवस्थापन" या विषयावर डॉ. जगदीश राठोड मार्गदर्शन दुपारी दोन वाजता करणार आहेत. दुपारी चार वाजता डॉ प्रशांत गजभिये, डॉ प्रशिक वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध वक्त्या दिशा पिंकी शेख या "स्त्री - पुरुष समानता " विषयावर व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कु. तुलसीताई हिवरे यांचं कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी सहायद्री ढोल ताशा पथक द्वारे पाहुण्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.
रविवार ९ एप्रिल १० वाजता देशभक्ती व महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीत गायन स्पर्धा होणार आहे. दुपारी १.३० वाजता डॉ. जगदीश राठोड यांचे संमोहन स्टेज शो होणार आहे. बक्षीस वितरण चे कार्यक्रम सायं. ४.३० वाजता सौ. लताताई वाढीवे पोलीस निरीक्षक चंद्रपूर, जयवंत काटकर उपमुख्याधिकारी बल्लारपूर, तेजिंदर सिंग दारी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, अरुण वाघमारे माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी डॉ. विजय कळसकर वैद्यकीय अधीक्षक बल्लारपूर व "ते पन्नास दिवस" कादंबरी चे लेखक पवन भगत यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. सायं. ५ वाजता डॉ राकेश गावतुरे "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पेनतील राष्ट्र" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या जलसा होणार आहे. या कार्यक्रमाची जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे आयोजक समिती ने एका पत्राद्वारे केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments