डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर करणाऱ्या गणेश ज्ञानेश्वर हिंगे यास अटक करा"- रिपब्लिकन संघर्ष समितीची मागणी. Arrest Ganesh Dnyaneshwar Hinge for disrespecting Dr. Babasaheb Ambedkar"- Republican Struggle Committee demanded.
बल्लारपूर -: दि.०३/०४/२०२३ श्री गणेश हिंगे रा. चंद्रपूर या व्यक्तीने फेसबुक वरून दोन समाजात तेड निर्माण होऊन, जातीय दंगली घडवून येतील अशा उद्देशाने व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनादर होईल असे वादग्रस्त विधान प्रसारित केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकर अनुयायामध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन रिपब्लिकन संघर्ष समितीचे संयोजक श्री भारतजी थुलकर, माननीय सरफराज जी शेख, संजय डुंबेरे, श्री वाजीद खान, श्री अविनाश गावंडे, श्री प्रभाकर रंगारी, विशाल डुंबेरे, श्री सोनू रायपुरे, मयूर आमटे इत्यादी विविध आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक माननीय उमेश पाटील यांचे मार्फत राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून श्री गणेश हिंगे या माथेफिरूस ताबडतोब ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात करण्यात आली आहे.
यासोबतच चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनला भीम आर्मी चंद्रपुरच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनातर्फे आरोपीस अटक न केल्यास संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आंबेडकरवादी जनता तीव्र आंदोलन छेडल अशा इशारा देण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments