चंद्रपुरात प्रथम जयभीम साहित्य संमेलन थाटात संपन्न, राजकीय पुढाऱ्यासह, साहित्यिक, विचारवंतांची उपस्थिती (The first Jaibhim Sahitya Samelan in Chandrapur was a grand success, attended by political leaders, literary figures and intellectuals.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरात प्रथम जयभीम साहित्य संमेलन थाटात संपन्न, राजकीय पुढाऱ्यासह, साहित्यिक, विचारवंतांची उपस्थिती (The first Jaibhim Sahitya Samelan in Chandrapur was a grand success, attended by political leaders, literary figures and intellectuals.)


चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात 1 व 2 एप्रिलला लोकजागृती संस्था तसेच जयभीम संमेलन समिती यांच्या संयुक्त माध्यमातून प्रथम जयभीम साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते 2 दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक राजकीय पुढाऱ्यासह साहित्यिक व विचारवंतांची उपस्थिती लाभली ज्यात संमेलनाध्यक्ष मा. रावसाहेब कसबे, लेखक, साहित्यिक व विचारवंत पुणे, मा. खा.बाळूभाऊ धानोरकर, (चंद्रपूर-आर्णी) मा. आ. विजय वडेट्टीवार, ब्रम्हपुरी, मा. प्रतिभा धानोरकर, (भद्रावती-वरोरा), मा. आ. किशोर जोरगेवार, चंद्रपूर, मा. अनिल हिरेखन, उपकुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, मा. प्राचार्य रत्नाकर अहिरे, प्रा. इसादास भडके, मा. आशिष जाधव, आयबीएन लोकमत, मा. सिध्दार्थ हत्तीअंभोरे, मा. अश्विनी खोब्रागडे, मा. कें.डी. मेश्राम व कार्यक्रमाचे आयोजक मा. अनिरुद्ध वनकर यांची विचार पिठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात पुरोगामी विचारवंतांच्या प्रतिमाना पुष्पहार व दीप प्रज्वलन करून झाली. या वेळी मार्गदर्शन करतांना मा विजय वडेट्टीवार म्हणालेत की, ज्या समाजाला  पुस्तक वाचण्यास मनाई होती त्याच समाजातील एका व्यक्तीने परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेवून या समाजाचीच नव्हे तर अवघ्या देशाची दशा व दिशाच बदलली एव्हढेच नव्हे तर या देशाला मार्ग दाखविणारे भारतीय संविधान दिले, जय भीम हा केवळ एक नारा नसून एक मोठा विचार आहे.   तदनंतर मा. किशोर भाऊ जोरगेवार मार्गदर्शन करतांना म्हणालेत की, भारतीय संविधानामुळेच एक टोपल्या विणून विकणाऱ्या आईच पोर हे राज्याचा प्रमुख ठिकाणी जाऊन लोकांचं प्रतिनिधित्व करीत आहे पूर्वी आम्ही मागणारे होतो आज आम्ही समाज बांधवांच ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. या जगाचा एक कोहिनुर हिरा म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पद्स्पर्शान चंद्रपुरची भूमी पावन झाली नागपूर नंतर धम्मदीक्षा सोहळ्याचा मान चंद्रपूरला मिळाला त्या ऐतिहासिक दीक्षाभूमी वरील सुसज्ज अशा ग्रंथालयातील व्यवस्थेसाठी 1 कोटी रु चा निधी उपलब्ध करून दिला तसेच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील नाट्य कलावंतांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी लवकरच 25 लक्ष रु च्या निधीच्या तरतुदीची घोषणा यावेळी किशोर जोरगेवार यांनी केली. 

             या साहित्य संमेलनात मार्गदर्शन करतांना  मा. खा.बाळूभाऊ धानोरकर म्हणालेत की, बाबासाहेब म्हणजे विचारांचं एक चालत बोलत विद्यापीठ होय, जगातील अनेक भाषावर त्यांचं उत्तम प्रभुत्व होत बाबासाहेबांनी घटना लिहताना केवळ स्वतःचा किंवा समाजाचा विचार न करता ओबीसी समाजाचा विचार केला प्रसंगी हिंदू कोड बिल मध्ये उल्लेख तरतुदीचे पालन न केल्यामुळं आपल्या मंत्री पदाचा सुध्दा त्याग केला. वर्तमान स्थितीत देशाचं संविधान धोक्यात असल्यामुळं त्याच रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. रावसाहेब कसबे आपले विचार मांडताना म्हणालेत की, जय भीम साहित्य संमेलन हे चिरकाल टिकणार असून महाराष्ट्राला लाभलेली संत विचाराची परंपरा ही पुरोगामी विचाराची होती मात्र तत्कालीन समाज व्यवस्थेच्या दडपणाखाली विचार दबल्या गेले आजही जगात भारताला बुध्दाचा देश म्हणुन ओळखलं जात. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मा. अनिरुध्द वनकर यांची प्रगट मुलाखत प्रा.इसादास भडके यांनी घेतली विविध प्रकारची प्रश्न विचारून अनिरुध्द वनकर यांना बोलत केल तसेच या संमेलनात दोन परिसंवादासह आंबेडकरी जलसा पार पडला या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)