केंद्र शासनाच्या स्वच्छ उत्सव 2023 अभियान अंतर्गत बल्लारपूर नगरपरिषदेने महाराष्ट्रात नगरपरिषद वर्गात दुसरे व एकत्रित सहावे तसेच देश पातळीवर नववे स्थान मिळविले (Under the Central Government's Swachh Utsav 2023 Mission, Ballarpur Municipal Council has secured the second and overall sixth position in the municipal council category in Maharashtra and ninth position in the country.)
बल्लारपूर :- केंद्र शासनाच्या स्वच्छ उत्सव 2023 अभियान अंतर्गत स्वच्छता प्रतिज्ञा उपक्रमात बल्लारपूर नगरपरिषदेने सहभाग घेऊन एकूण ६७,५६१ प्रतिज्ञा नोंदवीत महाराष्ट्रात नगरपरिषद वर्गात दुसरे व एकत्रित सहावे तसेच देश पातळीवर नववे स्थान गाठले आहे. नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी तसेच प्रशासक श्री. विशाल वाघ यांच्या नेतृत्वाखालील गठित प्रतिज्ञा नोंदणी समितिकडे सदर कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. प्रतिज्ञा नोंदणी समिति मध्ये श्री. दिपक पंडित (अंतर्गत लेखापरीक्षक), रीना बहोत (शिक्षण लिपिक), श्री. मंगेश सोनटक्के (शहर समन्वयक) तसेच मनोज डोमळे, सुनीता नन्नेवर, प्रणाली पाटील हे तीन डेटा एंट्री ऑपरेटर होते. श्री. विपिन पालीवाल (आयुक्त, चंद्रपूर मनपा) जे यापूर्वी बल्लारपूर नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते त्यानीही सदर उपक्रमात सहभाग घेऊन एकूण १,६३,६८८प्रतिज्ञा नोंदवीत चंद्रपूर महानगरपालिकेला महाराष्ट्रात चौथे व देश पातळीवर पाचवे स्थान मिळवून दिले आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे नागपूर विभागातून केवळ चंद्रपूर महानगरपालिका व बल्लारपूर नगरपरिषद या दोनच शासकीय कार्यालयानी महाराष्ट्रात तसेच देशपातळीवर प्रथम १० मध्ये स्थान मिळवले असून नागपूर विभागातून एकूण ६५% प्रतिज्ञा नोंदविल्या आहेत. दर उपक्रमात मिळालेल्या यशाबद्दल श्री. विशाल वाघ यांनी सर्वांचे आभार मानीत प्रतिज्ञा नोंदणी गट, सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षक वर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांनी केलेल्या सहकाऱ्याबद्दल स्तुति केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments