मुलगा आमदार, मात्र 80 वर्षाच्या वृध्द आई रस्त्याच्या कडेला बसून विकतेय बांबूच्या टोपल्या, आपला व्यवसाय करतांना त्यांना वाटतो अभिमान ! (The son MLA, but the 80 year old mother sits on the roadside and sells bamboo baskets, they feel proud while doing their business !)

Vidyanshnewslive
By -
0

मुलगा आमदार, मात्र 80 वर्षाच्या वृध्द आई रस्त्याच्या कडेला बसून विकतेय बांबूच्या टोपल्या, आपला व्यवसाय करतांना त्यांना वाटतो अभिमान ! (The son MLA, but the 80 year old mother sits on the roadside and sells bamboo baskets, they feel proud while doing their business !)

चंद्रपूर :- एखाद्या आमदाराची आई रस्त्याच्या कडेला बसून टोपल्या विकते असे सांगितले तर यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. चंद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गांधी चौकात वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून आमदाराची आई बांबूच्या टोपल्या विकतात. सध्या चंद्रपूरात महाकालीची यात्रा उत्सव सुरु आहे. यादरम्यान, रस्त्याच्या कडेला बसून टोपल्या विकत असलेला आमदाराच्या आईचा फोटो व्हायरल होत आहे. गंगुबाई जोरगेवार असे या आजीबाईंचे नाव असून त्या आमदार किशोर जोगरेवार यांच्या आई आहेत. किशोर जोगरेवार हे 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडूण आले होते. यावेळी ते 75 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. गंगुबाई जोरगेवार त्या परिसरात सर्वांच्या परिचयाच्या आहेत. सर्वजण त्यांना अम्मा या नावाने ओळखतात. त्यांचं वय सध्या 80 वर्ष आहे. आमदाराची आई म्हटल्यावर साधारणपणे विचार केला जातो की, त्या घरी बसून निवांत आयुष्य जगत असतात. मात्र अम्मा या आपला व्यवसाय नेटाने सांभाळतात. अजूनही टोपली विकताना ग्राहकांशी तीच घासाघीस तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्या आनंद शोधत असतात. 2019 साली किशोर ज्यावेळी आमदार बनले तेंव्हादेखील माध्यमांशी बोलताना गंगुबाई यांनी आपण आपला व्यवसाय सोडणार नसल्याचे सांगितले होते. मुलगा आमदार असला म्हणून काय झालं, मी माझा व्यवसाय सोडणार नाही असंच त्या सांगत असतात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जोगरेवार यांनी त्यांची साथ शिंदे-फडणवीस सरकारला दिली. त्यावेळी त्यांच्यावर खोके घेतल्याचे आरोप झाले मात्र त्यांनी आपल्या आईच्या कष्टाचा दाखला देत त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे आमदार किशोर जोगरेवार यांनादेखील त्यांच्या आईच्या या कामाचं कौतुक आहे. बांबू ताटवे, टोपल्या याचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. तेच श्रम- तोच व्यवसाय- तेच कष्ट आणि तोच आनंद मिळवत आहे. “श्रम ही है श्रीराम हमारा” असा नारा देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे याच भूमितील आहेत. आणि त्यांचा हा नारा लक्षात ठेवून अम्मांचा व्यवसाय आजही दिमाखात सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)